Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता
       

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. दरम्यान 12 ते 16 जून या कालावधीत राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून कोकण आणि गोवा येथे 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालकांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या 3 ते 4 दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 12 जून रोजी मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे 12 आणि 15 जून दरम्यान मुसळधार तर 13 ,14 जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान वेधशाळेच्या संचालकांनी नागरिकांनी सतर्क रहावे असे म्हटले आहे. तसेच सतर्कतेबाबत विविध सुचना देखील केल्या आहेत. 12 ते 16 जून या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना नागरिकांनी खुल्या मैदानावर काम करु नये, वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, वीजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज पुरवठा खंडित करुन ठेवावीत, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना वेधशाळेच्या संचालकांनी दिल्या आहेत.


       
Tags: heavyJune 12 to 16likelyMaharashtraMonsoonrainsreactivatestatewill
Previous Post

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक

Next Post

समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस, वंचितने केला सत्कार

Next Post
समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस,  वंचितने केला सत्कार

समता महिला शेतकरी गटाने मिळवले आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षीस, वंचितने केला सत्कार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!
बातमी

Pune Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

by mosami kewat
July 5, 2025
0

पुणे : राज्यात अनुकूल हवामानामुळे मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून, अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील...

Read moreDetails
दु:खद! समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

दु:खद! समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

July 5, 2025
Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

July 4, 2025
सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

July 4, 2025
बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

July 4, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क