Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 7, 2025
in बातमी
0
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

Mumbai, India - August 21, 2019: Enforcement Directorate office at Ballard Estate,Fort in Mumbai, India, on Wednesday, August 21, 2019. (Photo by Kunal Patil/Hindustan Times)

       

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदार व महापालिका अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ईडीने काल मुंबई आणि कोची येथील एकूण 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकरणात कंत्रादाराने व महापालिका अधिकाऱ्यांनी 65 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ईडीने कारवाईसाठी शुक्रवारी मुंबईसह कोची शहरात छापेमारी केली. यावेळी संबधित कंत्राटदारासह एकूण 15 ठिकाणी छापे टाकण्यात आले..

काल अचानक ईडीने 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई आणि कोची येथे 15 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये घोटाळ्यातील संबंधित कंत्राटदारासह कंपनीचे मालक, सिनेअभिनेता दिनो मोरिया, त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया, मध्यस्थाच्या घरासह कार्यालयाचा समावेश आहे. काही महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारासह इतरांच्या घरावर, कार्यालयावर ईडीने छापेमारी करत कारवाई केली. या कारवाईत काही आक्षेपार्ह दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. गाळ काढण्याचे यंत्रसामग्री पुरविणार्‍या कंपनीपैकी एक मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोचीतील आहे तर इतर भागीदार मुंबईतील आहेत त्यामुळे ही कारवाई मुंबई आणि कोची या ठिकाणी केली. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कंत्राटदार कंपनी कोची शहरातील होती. याच कंपनीने मनपाला बोगस बिल दिल्याचा आरोप आहे. या कारवाईत काही आक्षेपार्ह कागदपत्रांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले असून या कागदपत्रांची शहानिशा सुरू आहे.


       
Previous Post

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

Next Post

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

Next Post
राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार
बातमी

Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार

by mosami kewat
July 6, 2025
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल...

Read moreDetails
मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

BMC School Staff Shortage : मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

July 6, 2025
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

July 6, 2025
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

July 6, 2025
Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

July 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क