Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बंगळुरू पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकारी निलंबित, आरसीबीच्या कंपनीविरोधात गुन्हा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 8, 2025
in बातमी
0
बंगळुरू पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकारी निलंबित, आरसीबीच्या कंपनीविरोधात गुन्हा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा
       

बंगळुर – बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. यामध्ये त्यांनी बंगळुरू शहराच्या पोलिस आयुक्तांना निलंबित केलं आहे. तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त, एसीपी, डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलिस निरिक्षक यांना निलंबित केलं आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासह या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्टेडिअमच्या बाहेर मोठी गर्दी जमा झाल्याने बंगळुरची चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर यामध्ये 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी याप्रकरणी कडक कारवाईला सुरुवात केली आहे.

कर्नाटक सरकारने बंगळुरू चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल डी कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करणार आहे. या समितीला 30 दिवसांच्या आत आपला अहवाल देण्याचे आदेश सिद्धारमय्या सरकारने दिले आहेत. तसेच या घटनेला जे जबाबदार असतील त्या सर्वांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी दिली आहे.


       
Tags: againstannouncesBengalurucaseChiefincludingKarnatakaMinisterofficerspolicePolice CommissionerRCB's companyregisteredSeveralsuspended
Previous Post

भाजप आणि काॅग्रेसच्या युतीवर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

Next Post
डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव कथित ‘एपस्टीन फाईल’मध्ये आल्याने देशाचे सार्वभौमत्व आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे....

Read moreDetails
नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

March 16, 2026
ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

March 16, 2026
घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

March 16, 2026
अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून

अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home