लोकमाता, राजमाता, महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त पिंपरी मोरवाडी चौक येथील माता अहिल्यादेवी यांच्या पुतूळ्याला वंचित बहुजन आघाडी पिंपरीचिंचवड शहराच्या वतीने कार्याध्यक्ष मा.नगरसेवक अकुंश कानडी व शहर प्रवक्ते के.डी.वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर महासचिव संतोष जोगदंड, कोषाध्यक्ष राजेश बारसागडे, उपाध्यक्ष सुनिल गायकवाड, उपाध्यक्ष बिरूदेव मोटे, युवानेते चंद्रकांत लोंढे, राहुल बनसोडे, घरकुल शाखेचे अशोक शिवशरण, राजीव कुंभार, अण्णा पाखरे आदि शहर पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष
नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण...
Read moreDetails






