Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिवा-मुंब्रा रेल्वे दुर्घटनेचे मुंबईत पडसाद; CSMT मुख्यालयात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 10, 2025
in बातमी
0
दिवा-मुंब्रा रेल्वे दुर्घटनेचे मुंबईत पडसाद; CSMT मुख्यालयात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       

मुंबई – दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रम झाली आहे. वंचितच्या मुंबई प्रदेशतर्फे CSMT येथील DRM मुख्यालयात आज धडक दिली. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या शिष्टमंडळाने DRM अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भात ५ महत्त्वाच्या मागण्या रल्वे अधिकाऱ्यांकडे मुंबई प्रदेश वंचितने केल्या आहेत.

या मागण्यांमध्ये दिवा-मुंब्रा रेल्वे दुर्घटनेची सखोल आणि पारदर्शी चौकशी करावी, सर्व प्रवाशांना अपघात विमा योजना लागू करणे, स्वयंचलित दरवाज्यांचा फेरविचार, रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांसाठी सुरक्षित पायवाटा, आणि अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे यांचा समावेश होता.वंचितने यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले. फुटपाथवर प्रवासी उभे राहत असल्याने अपघात घडतात, आणि मदतीचा अभाव असल्याने मृत्यू होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यामध्ये मुंब्रा रेल्वे स्थानक येथे झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी मध्य रेल्वे प्रशासन कडून झाली पाहिजे. दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेले तसेच दवाखान्यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन कशा प्रकारे ठोस उपाययोजना करणार आहे याबाबतचा खुलासा मध्य रेल्वे प्रशासनाने केला पाहिजे. मागील अनेक वर्षांमध्ये झालेल्या दुर्घटना तसेच काल मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेची सर्व जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे. अशा प्रकाच्या मागण्या वंचितने केल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने अपघातग्रस्तांना विमा लागू करण्याची मागणी मान्य केली नाही. कारण महाराष्ट्र सरकारने आधीच आर्थिक मदतीची घोषणा केली असल्यामुळे केंद्र सरकार वा रेल्वे वेगळी मदत जाहीर करू शकत नाही, असे DRM अधिकाऱ्यांनी यावेली वंचितच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. दरम्यान, रेल्वेने स्वयंचलित दरवाज्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गर्दीच्या परिस्थितीत हे दरवाजे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकतात, अशी भीती वंचितने व्यक्त केली आहे.

वंचित बहुजन आघाडीने मुंबईच्या लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाने सुरक्षेबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


       
Tags: accidentaggressiveCSMTDiva-MumbraheadquartersMaharashtramumbaiPrakash AmbedkarrepercussionstrainVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Aghadi
Previous Post

सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी केले सुरक्षा दलांना लक्ष्य, स्फोटात पोलिस अधिकारी शहीद, अनेक जवान जखमी

Next Post

बोगस लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी वाईट बातमी; योजनेचे पैसे होणार बंद

Next Post
बोगस लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी वाईट बातमी; योजनेचे पैसे होणार बंद

बोगस लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी वाईट बातमी; योजनेचे पैसे होणार बंद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज. वि. पवार यांच्या 'आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा' पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन
बातमी

ज. वि. पवार यांच्या ‘आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

by mosami kewat
December 5, 2025
0

मुंबई : आंबेडकरी चळवळीत गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ सातत्याने सक्रिय सहभाग घेणारे ज्येष्ठ विचारवंत ज. वि. पवार यांच्या महत्त्वपूर्ण...

Read moreDetails
संविधानाच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरवादी संघर्ष करत राहतील: चैत्यभूमीवर VBA च्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद

संविधानाच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरवादी संघर्ष करत राहतील: चैत्यभूमीवर VBA च्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद

December 5, 2025
पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

December 4, 2025
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! समाजकल्याण वसतिगृहातील निकृष्ट जेवणावर सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! समाजकल्याण वसतिगृहातील निकृष्ट जेवणावर सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

December 4, 2025
तिवसा : शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी दिवसाच्या वेळीच कृषीपंप वीजपुरवठा सुरू करा - महावितरणला वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

तिवसा : शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी दिवसाच्या वेळीच कृषीपंप वीजपुरवठा सुरू करा – महावितरणला वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

December 4, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home