Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

जगभरातील समतेच्या आणि न्यायाच्या लढ्याचं प्रतीक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रबुद्ध भारत by प्रबुद्ध भारत
May 30, 2020
in Uncategorized
4
       

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे व्यक्तिमत्व हे अतिशय संघर्षातून तयार झाले आहे हे आपण वारंवार बोलत आणि ऐकत असतो, आणि खरोखरच हि सत्यता आहे पण बाबासाहेबांचा संघर्ष हा शोषित,पीडित,वंचित अशा सर्व समुदायासाठी होता हि गोष्ट आपण विसरून जाऊन बाबासाहेबांवर एकजातीय एक धर्मीय उत्थानाचा ठपका ठेवतो हे आपल्या कोत्या मानसिकतेचे उदाहरण आहे असेच मानावे लागेल. बाबासाहेबांच्या एकूण संघर्ष्याचे वर्णन करायचे झाल्यास ठळकपणे आपल्या डोळ्यासमोर काळाराम मंदिर सत्यागृह, महाड चवदार तळे सत्याग्रह या दोन गोष्टी प्रामुख्याने येतात आणि आपण सरळ सरळ यांची तुलना हि दलित हक्क एवढीच करतो परंतु यात खोलात जाऊन अभ्यास केल्यास असे आढळून येते कि हे लढे प्रतिकात्मक स्वरूपाचे असुन यातून मानवी हक्काचा संदेश देऊन बाबासाहेब जागतिक स्तरावर मानवमुक्तीच्या लढ्याचे उद्गाते बनले आहेत असेच म्हणावे लागेल. बाबासाहेब व त्यानंतरच्या कालखंडातील विचारवंतांच्या मतांचा अभ्यास केल्यास प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याबाबत येतील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अभ्यासकांनी बाबासाहेबांच्या लढ्याला फक्त दलित चळवळ एवढेच स्वरूप दिल्याचे दिसते तर दुसरीकडे कम्युनिस्ट लोकांनी बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश साम्राज्यशाहीचे हस्तक असल्याचा ठपका ठेवला आहे आणि उरल्यासुरल्या विचारवंतांनी बाबासाहेबांना राज्यघटना निर्मिती पुरतेच मर्यादित ठेवले आहे.

प्रत्यक्षात बाबासाहेबांच्या लढ्याचा उल्लेख करताना नामदेव ढसाळ त्यांच्या आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट या पुस्तकात म्हणतात “आंबेडकरांचा लढा हा मूलतः सामाजिक, भौतिक उत्थापनासाठी- समतेसाठी होता. माणुसकीच्या हक्कासाठी होता. भौतिक शोषणातून मुक्त होण्यासाठी व माणुसकीच्या प्रतिष्ठेसाठी होता. या लढ्यातून एकसंघ राष्ट्रीय समाज निर्माण करण्याचे ध्येय साध्य होते “. याच्याच पुढे जात असताना आंबेडकरांच्या संघर्षमय कालखंडातील फार मोठी शक्ती हि राजकीय डावपेचात खर्च झाल्याचे डॉ. रावसाहेब कसबे आपल्या आंबेडकरवाद : तत्व आणि व्यवहार या पुस्तकात म्हणतात. त्याचबरोबर पुढे ते आंबेडकर हे तत्वज्ञ नेते असून त्यांनी तत्वज्ञान हे केवळ हौस म्हणून मांडले नसून किंवा विश्वाचे मूळ शोधण्यासाठी हि मांडले नाही तर या जगाची पुनर्रचना करण्यासाठी मांडल्याचे नमूद करतात. भारतीय समाजातील जनतेसमोर जातिसंस्था आणि दारिद्र्य हे दुःखाचा डोंगर म्हणून उभा असताना यातून मुक्तीचा मार्ग शोधणे हेच बाबासाहेबांच्या साऱ्या आयुष्याचे प्रयोजन होते असेही ते म्हणतात.

लढा कोणाला लढायचं असतो व कशासाठी लढायचं विचार केला असता मला तर प्रामुख्याने ज्यांच्यावर शोषण, भेदभाव, अन्याय-अत्याचार, गुलामगिरी यासारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांना आपल्या स्वातंत्र व न्याय हक्कासाठी लढा उभारणे अपेक्षित असते. भारतीय समाजव्यवस्थेचे आकलन केल्यास असे आढळून येईल कि इथला समाजाचे दलित, आदिवासी, महिला, शेतकरी आणि कामगार वर्ग प्रामुख्याने उपेक्षित व वंचित असल्याने बाबासाहेबानी हेरून त्यांच्यासाठी लढा दिल्याचे दिसून येते. शेतकरी व कामगार वर्गाविषयी केलेले बाबासाहेब आंबेडकर यांचे काम हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. १९३६ साली बाबासाहेबानी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून भूमिहिन, गरीब कुळे, शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र मजूर पक्ष्याचा जाहीरनामा पहिला असता बाबासाहेबांची शेतकरी व कामगार वर्गाविषयीची तळमळ दिसून येते. याचबरोबर त्यांनी शेतीवरील भर कमी करून कौशल्य विकासावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. १९३८ मध्ये आलेल्या औद्योगिक विवाद विधेयकाला बाबासाहेबानी कडाडून विरोध केला. व त्याविरोधात एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी करून कामगार वर्गाच्या हक्काला वाचा फोडली. त्यानिमित्ताने बाबासाहेब म्हणतात कि प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार असला पाहिजे. संप म्हणजे स्वातंत्राइतकाच पवित्र हक्क आहे. १९४२ ते ४६ मध्ये बाबासाहेबानी मजूर मंत्री असताना कामगार वर्गासाठी विविध योजना व दूरदृष्टीने विविध प्रकल्प राबविले. त्यात महिला कामगार वर्गासाठीही विशेष तरतुदी केल्याचे आढळते. १९४३ साली श्रमिक संघटना कायदा हे भारतीय कामगार चळवळीला संजीवनी देणारे विधेयक मांडले व या विधेयकाने कामगार संघटना निर्माण करण्याचा हक्क कामगारांना मिळाला.

महिलांच्या मूलभूत हक्कासाठी बाबासाहेबानी विशेष काम केल्याचे दिसून येते. १९४२ साली नागपूर येथे अखिल भारतीय शोषित समाज महिला परिषद घेऊन त्यात असे सांगितले कि एखाद्या समाजाची प्रगती हि त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून कळते. बाबासाहेबांच्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग होता यावरून बाबासाहेब स्त्री पुरुष समतेबद्दल आग्रही असल्याचे दिसते व त्याचीच एक झलक म्हणजे महाड चवदार तळ्यातील संघर्षात महिलांचा सहभाग, व काळाराम मंदिर सत्यागृहात महिलांचा सहभाग व  महिलांना झालेली अटक हि होय. बाबासाहेबानी आपल्या कालखंडात महिलांच्या चळवळीतील सहभागातून महिला नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेच्या माध्यमातून समानतेचे सूत्र अंगीकारून एका अर्थाने ते महिला उद्धारकच ठरले. १९५१-५२ मध्ये बाबासाहेबानी संसदेत स्त्री गुलामी नष्ट करून संपूर्ण भारतातील स्त्रियांना न्याय देणार हिंदू कोड बिल नावाचं विधेयक मांडलं व ते मंजूर न झाल्यामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला. हिंदू कोड बिल बाबत बोलताना बाबासाहेब म्हणतात कि भारतीय समाजातील वर्गावर्गातील असमानता व स्त्री-पुरुष असमानता तशीच ठेवून आर्थिक समस्यांवर निगडित कायदे बनवणे म्हणजे राज्यघटनेची चेष्ठा करून शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे आहे. बाबासाहेबांच्या काळात हिंदू कोड बिल तर मंजूर होऊ शकले नाही पण नंतरच्या काळात त्यातील महत्वाच्या तरतुदी लागू केल्यामुळे स्त्रियांना सामान संधी, घटस्फोट, पोटगी, संपत्तीचा अधिकार, संवैधानिक हक्क, सोयी, सुविधा मिळाल्या. बाबासाहेबांच्या अथक परिश्रमातून मिळालेल्या महिलांच्या आत्मसन्मानामुळे बाबासाहेबांना महिलांचे मुक्तिदाते म्हणले तरी वावगे ठरणार नाही. 

बाबासाहेबानी सामाजिक न्यायासाठी अविरत प्रयत्न केले असे म्हणताना सामाजिक न्याय म्हणजे काय हे समजून न घेता फक्त दलितांसाठी विविध योजना राबवणे म्हणजे सामाजिक न्याय म्हणणे योग्य ठरणार नाही. बाबासाहेबांची सामाजिक न्यायाची संकल्पना हि स्वातंत्र, समता, बंधुता या मानवी उच्चतम सूत्रांवर आधारली आहे. ज्या सामाजिक न्यायाचा बाबासाहेबानी नेहमीच पुरस्कार केला तो केवळ एका जातीसाठी मर्यादित नव्हता तर तो जातीच्या सीमा भेदून वंचित, स्त्री, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांना पण कवेत घेणारा होता. बाबासाहेब एका ठिकाणी याबाबत म्हणतात हि बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना नष्ट करू नये व अल्पसंख्याकांनी अल्पसंख्यत्वाचा फायदा घेऊ नये तर आपआपसात समन्वय साधून स्वतः चा विकास करावा. बाबासाहेबांची न्यायाची संकल्पना हि फक्त राजनैतिक न्याय यापुरती मर्यादित न राहता हि सामाजिक आणि आर्थिक न्यायापर्यंत जाते किंबहुना याशिवाय न्याय नाहीच असे सांगते. न्याय हा व्यक्तिसापेक्ष न राहता तो व्यक्तिनिरपेक्ष असला पाहिजे म्हणून त्यांनी संविधानातून समानतेचे तत्त्व अंतर्भूत करताना न्यायासमोर समानता, कायद्याची समान वागणूक, संधींची समानता, विषमताविरहीत समाजव्यवस्था आदी गोष्टी त्यांनी मूलभूत हक्कांच्या कलमात स्वीकारल्या आहेत.

बाबासाहेब आंबेडकर हे कट्टर लोकशाहीवादी होते आणि तितकेच राष्ट्रवादी होते म्हणूनच ते १९६० नंतर सुद्धा जगभरातील समतेच्या आणि मानवी हक्काच्या लोकशाही मार्गाने झालेल्या व होणाऱ्या विविध लढ्याचे प्रेरणास्थान बनून ऊर्जा प्रदान करताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नेल्सन मंडेला म्हणतात कि आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं. डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे. हल्लीच्या काळात होणारी देशभरातील विद्यापीठस्तरीय विद्यार्थ्यांची आंदोलने, सीएए- एनआरसी विरोधातील आंदोलने, दलित, आदिवासी, शेतकरी-कामगार  आंदोलने, आरक्षण आदोलने हि बाबासाहेबांचा विचारांना व प्रतीकांचा आधार घेऊनच पुढे जात आहेत व हि आंदोलने परिवर्तनवादी नवसमाज निर्मितीतील बाबासाहेबांच्या उत्तुंग कृतत्वाचीच साक्ष देत आहेत.

दिनकर बळीराम कांबळे

निफ्टम, कुंडली (हरियाणा)

Mob. No. 9653579358

 


       
Tags: परिवर्तनवादीमहिलांचे मुक्तिदातेराष्ट्रवादीलोकशाहीवादीश्रमिक संघटना कायदासत्यागृहहिंदू कोड बिल
Previous Post

नाचु; फटाके-बंदुका उडवू; निर्लज्जपणे वाढदिवस करु; तरीही आम्ही ..!

Next Post

गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे – प्रकाश आंबेडकर

Next Post
गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे – प्रकाश आंबेडकर

गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे - प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रक्षाबंधनानिमित्त वंचित महिला आघाडीचा अनोखा उपक्रम; पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची आठवण‎
बातमी

रक्षाबंधनानिमित्त वंचित महिला आघाडीचा अनोखा उपक्रम; पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची आठवण‎

by mosami kewat
August 16, 2025
0

पुणे : उत्तम नगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या खडकवासला विधानसभा शाखेने अनोख्या पद्धतीने पोलिसांना...

Read moreDetails
independence day : दापोलीत ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्यान

independence day : दापोलीत ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्यान

August 16, 2025
लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2025
अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

August 15, 2025
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

August 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home