Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

छत्तीसगड बीजापूर जिल्ह्यातील चकमकीत 5 नक्षलवादी ठार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 8, 2025
in बातमी
0
छत्तीसगड बीजापूर जिल्ह्यातील चकमकीत 5 नक्षलवादी ठार
       
छत्तीसगड, बीजापूर: छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या दोन चकमकीत ५ नक्षलवाद्यी ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या ३ दिवसांत या इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान एकूण ७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून, यामध्ये नक्षलींचे मोठे नेते सुधाकर आणि भास्कर यांचाही समावेश आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्य पोलिसांचे विशेष कार्यबल, जिल्हा राखीव गट आणि सीआरसीएफच्या विशेष कोब्रा पथकाने ४ जून रोजी ही मोहीम सुरू केली होती.

“छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नॅशनल पार्क भागात नक्षलविरोधी मोहिम ४ जूनपासून सुरू आहे. या नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी ७ माओवादींचे मृतदेह हस्तगत केले आहेत,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी गोळीबारानंतर २ मृतदेह सापडले, तर शुक्रवारी आणि शनिवारी दरम्यान झालेल्या चकमकीनंतर ३ मृतदेह मिळाले, असे त्यांनी सांगितले. यामध्ये माओवादी नेते सुधाकर, तेलंगणा राज्य समिती सदस्य बंदी प्रकाश, दंडकारण्य विशेष झोनल कमिटी सदस्य पप्पा राव आणि इतर सशस्त्र नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाल्यावर ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

Tags: 5 NaxalitesBijapurChhattisgarh'sdistrictencounterkilled
Previous Post

शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य – चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

बकरी ईदनिमित्त दिली ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःची कुर्बानी

Next Post
बकरी ईदनिमित्त दिली ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःची कुर्बानी

बकरी ईदनिमित्त दिली ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःची कुर्बानी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीची हत्या; नेपाळमध्ये हिंसाचार आणि आंदोलनाने घेतले हिंसक वळण
बातमी

माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीची हत्या; नेपाळमध्ये हिंसाचार आणि आंदोलनाने घेतले हिंसक वळण

by mosami kewat
September 9, 2025
0

नेपाळ : नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचार आणि आंदोलनाने एक गंभीर वळण घेतले आहे. सरकारच्या भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर लावलेल्या...

Read moreDetails
‎२ वर्षांपासून सारथीची फेलोशिप ठप्प, तर महाज्योतीचे विद्यावेतनही केले बंद‎‎

‎२ वर्षांपासून सारथीची फेलोशिप ठप्प, तर महाज्योतीचे विद्यावेतनही केले बंद‎‎

September 9, 2025
चाकूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन

चाकूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन

September 9, 2025
‘मराठा-ओबीसींची ताटे वेगळी ठेवा’; हैदराबाद गॅझेटच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

‘मराठा-ओबीसींची ताटे वेगळी ठेवा’; हैदराबाद गॅझेटच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

September 9, 2025
नेपाळमधील निदर्शने चिघळली: सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणाई आक्रमक, राष्ट्रपतींच्या घराला घेराव

नेपाळमधील निदर्शने चिघळली: सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणाई आक्रमक, राष्ट्रपतींच्या घराला घेराव

September 9, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home