मुंबई – नुकतीच नागपुरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली. यामध्ये चक्क भाजपने आपल्या पांरपरिक विरोधक असलेल्या कॉग्रेससोबत युती केल्याचे समोर आले आहे. नागपूर भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड आहे. तसेच याच नागपुरात आरएसएसचे मुख्यालय असून हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच ठिकाणी भाजपने चक्क काॅग्रेससाेबत युती केल्याने आचर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत राजकीय पक्षांकडून भाजप व काॅग्रेस या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच सोशल मीडियावर देखील यावर उलट सुलट चर्चा रंगली आहे. समाज माध्यमांमध्ये पारंपरिक मनुवादी विचारसरणीचे भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकत्र आले हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही तर ही पारंपरिक युती आहे, असे अनेकांनी म्हटले आहे.
तसेच अनेकांनी आता जानवेधारी राहुल गांधीं व काँग्रेसला यावर कोणी प्रश्न विचारणार का असा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे भाजप हा नौटंकीबाज पक्ष असून, सत्तेसाठी तो कोणत्याही थराला जावू शकतो, असे अनेकांनी म्हटले आहे. भाजप आणि काॅग्रेस हे एकच असून, ते सापनाथ आणि नागनाथ असल्याचे म्हटले आहे.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails