Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण

mosami kewat by mosami kewat
May 26, 2026
in Uncategorized
0
इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण
       
पुणे : इबोला विषाणूच्या वाढत्या lपार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन सतर्क झाले असून, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. विशेषतः दुबई आणि बँकॉक येथून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक लक्ष ठेवले जात असून, त्यांची थर्मल स्क्रिनिंग आणि वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला साथीबाबत आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारनेही खबरदारीच्या उपाययोजना वाढवल्या आहेत. पुणे विमानतळावर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या कोणत्याही प्रवाशामध्ये इबोलाची लागण आढळलेली नसली, तरी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. भारतात सध्या इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसला, तरी विमानतळांवर दक्षता वाढवण्यात आली आहे.

इबोलाची प्रमुख लक्षणे :

– अचानक तीव्र ताप येणे

– सतत अशक्तपणा जाणवणे

– तीव्र डोकेदुखी

– स्नायूंमध्ये वेदना

– उलट्या आणि जुलाब

– डोळे लाल होणे

– भूक मंदावणे

इबोला हा अत्यंत गंभीर आणि जीवघेणा संसर्गजन्य आजार मानला जातो. बाधित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक द्रव किंवा दूषित वस्तूंच्या संपर्कातून हा विषाणू पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या मृतदेहालाही संसर्गाचा मोठा धोका असतो. डीआरसी (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इबोलाच्या उद्रेकात शेकडो संशयित रुग्ण आढळले असून अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे जगभरातील विमानतळांवर खबरदारी वाढवण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार, इबोलाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांवर 21 दिवस विशेष निरीक्षण ठेवले जाणार आहे. या कालावधीत ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आणि प्रवासाचा संपूर्ण इतिहास सांगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विमानतळ आरोग्य विभाग संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, प्रवाशांनी आरोग्य तपासणी प्रक्रियेत सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: Aabola VirusMaharashtrapune
Previous Post

बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण
Uncategorized

इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण

by mosami kewat
May 26, 2026
0

पुणे : इबोला विषाणूच्या वाढत्या lपार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन सतर्क झाले असून, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू...

Read moreDetails
बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

May 25, 2026
४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

May 25, 2026
Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

May 25, 2026
उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

May 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home