Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर
       

पुणे : डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजना देखील प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाऊर्जासाठी दोन उद्दिष्टे महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती देणार, तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेप्रमाणे त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक तर दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाऊर्जाने गेल्या काही वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यात चांगली कामगिरी केली आहे. 2026 च्या डिसेंबरपर्यंत कृषी क्षेत्राची संपूर्ण वीज मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या 20 वर्षात दरवर्षी वीजेचे दर 9 टक्क्याने वाढवत आहोत. मात्र 2025 ते 2030 या कालावधीमध्ये दरवर्षी वीजेचे दर कमी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


       
Tags: allDecember 2025endenergygovernmentMaharashtraofficessolarstateusing
Previous Post

बंगळुरू पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकारी निलंबित, आरसीबीच्या कंपनीविरोधात गुन्हा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Next Post
राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home