Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिल्ली सरकारला लाज वाटली पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 5, 2025
in बातमी
0
दिल्ली सरकारला लाज वाटली  पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई – हाताने गटार साफ करणे, हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे ही पद्धत बंद झाली आहे. ही प्रथा अमानवी असल्याचे अनेकवेळा सांगितले गेले आहे. तरीही दिल्ली शहरात राजरोस आजही हाताने गटार साफ केले जात असून, हाताने मैला साफ केला जात असल्याचे वास्तव मांडणारे काही फोटो आणि त्याबाबतचा मजकूर दिल्ली सरकारच्या सामाजिक बांधकाम विभागाने सोशल मीडिया एक्स हॅडलवर शेअर केले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय मंत्रालयाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत दिल्ली सरकारला जोरदार फटकारले आहे.

प्रकाश आंबेडकर यांंनी सोशल मीडिया एक्सवर लिहताना म्हटले आहे की, आपल्याकडे चंद्रावर पोहोचून परत येण्याचे तंत्रज्ञान आहे, पण आपला समाज आजही जातीने ग्रस्त असून समाज गटार साफ करण्यासाठी यंत्रे वापरण्यास असमर्थ आहे. तसेच हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे या पद्धतींवर बंदी आहे. परंतु ही अमानवी प्रथा अजूनही प्रचलित आहे. कारण “जात असते आणि ती जात नाही. तसेच ही अमानवी प्रथा थांबवण्यासाठी किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अजिबात दिसत नाही असे त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला उद्देशून म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून दिल्ली येथील मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दु:ख मांडले आहे. त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला लाज वाटली पाहिजे असेही म्हटले आहे. तसेच आपल्या देशातील जात वास्तव यानिमित्ताने अधोरेखीत होत असून आपल्याकडील जात वास्तव जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ही अमानवी प्रथा बंद करण्याची व या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकारणी लोकांची इच्छाशक्ती अजिबात नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या राजकीय लोकांना याबाबत लाज वाटली पाहिजे असेही सुनावले आहे.


       
Tags: delhiMaharashtraPrakash Ambedkarsafai kamgarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे

Next Post

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Next Post
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी
बातमी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला...

Read moreDetails
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026
अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

September 11, 2026
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

September 10, 2026
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home