Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 9, 2025
in Uncategorized
0
मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
       
मणिपूर – मणिपूरमध्ये सीबीआयने मैतेई गटाच्या नेत्या अरामबाई टेंगगोलला अटक केल्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरु झाला आहे. त्यामुळे मणिपूरमधील पाच जिल्ह्यात रवीवारी रात्री इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

याबाबत सीबीआयने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शनिवारी रात्री अरामबाई टेंगगोलला ताब्यात घेतल्याच्या बातम्या पसरताच, निदर्शने उसळली. तेव्हा इम्फाळ शहराच्या विविध भागात टायर जाळले आणि रस्ते अडवले. क्वाकीथेल परिसरात सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये चकमक झाली. यावेळी अनेक निदर्शक जखमी झाले आहेत.

मणिपूरचे गृह आयुक्त एन. अशोक कुमार यांनी इंटरनेच सेवा 5 दिवस बंद ठेवण्यासह प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारी पहाटे इंफाळ पूर्व आणि पश्चिम, काकचिंग, थौबल आणि बिष्णुपूर या 5 जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले. यानुसार व्हीएसएटी आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्या आहेत.

तर गृह विभागाने दिलेल्या आदेशात “काही समाजविरोधी घटक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात प्रतिमा, द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यासाठी करू शकतात. ज्यामुळे लोकांच्या भावना भडकतील आणि मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.” असे गृह विभागाने म्हटले आहे.

Tags: 5 districtsbreaksimposedmanipurordersout againprohibitoryViolence
Previous Post

स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ; ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

Next Post

तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Next Post
तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
बातमी

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

by mosami kewat
March 14, 2026
0

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails
मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 14, 2026
औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

March 14, 2026
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

March 14, 2026
सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

March 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home