पंढरपूर – आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील कायद्याच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी संविधान दिंडी काढून वारीमध्ये सहभाग नोंदवला.
वैचारिक कट्टा, अभंग प्रबोधिनी आणि त्रिमुखसिंह सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने ही दिंडी काढण्यात आली. “वारीची शिकवण म्हणजेच संविधानाची शिकवण” या संकल्पनेवर आधारित दिंडी बाबा पेट्रोल पंपपासून पंढरपूरकडे रवाना झाली.
मार्गात विविध ठिकाणी भजन, भारुड, घोषणांद्वारे समता, बंधुता, श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचा संदेश देण्यात आला. ही दिंडी यशस्वी करण्यासाठी सौरभ औटे, सौरभ लोंढे, राहुल राठोड आणि केदार कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. वारकरी संप्रदायाच्या अध्यात्मिक परंपरेसोबत संविधानातील मूल्यांची सांगड घालणारा हा उपक्रम समाजप्रबोधनाच्या दृष्टिकोनातून उल्लेखनीय ठरला.