मुंबई – वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौध्द महासभा शाखा सिध्दार्थ कॉलनी, वॉर्ड क्र.१५६ च्या विद्यमाने त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्ताने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्षा सुगंधाताई सोंडे,चेंबूर तालुका महिला अध्यक्षा अंकिताताई गायकवाड, वॉर्ड क्र.१५६ महिला अध्यक्षा सुनिताताई पगारे यांच्या उपस्थितीत मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह,चेंबूर येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रसूतिगृह येथील गर्भवती महिलांना फळे व पौष्टिक आहार आणि दिवलीबेन मोहनलाल मेहता (माँ हॉस्पिटल) येथील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्यावेळी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.