Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Nashik : प्रभाग रचना राजकीय फायद्यासाठी नको; वंचित बहुजन आघाडीचा आयुक्तांना इशारा

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 28, 2025
in बातमी
0
"प्रभाग रचना करताना राजकीय दबाव टाळा; वंचित बहुजन आघाडीचा नाशिक महापालिकेला इशारा"

"प्रभाग रचना करताना राजकीय दबाव टाळा; वंचित बहुजन आघाडीचा नाशिक महापालिकेला इशारा"

       

नाशिक : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवावी आणि अल्पसंख्याक, अनुसूचित जाती व जमातींच्या प्रभागांची तोडफोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी आग्रही भूमिका मांडली. (Nashik)

शिंदे यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला की, जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून राजकीय दबावाखाली प्रभाग रचना केली गेली, तर त्या गंभीर परिणामांसाठी संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनावरच राहील.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून, अशा वेळी नाशिकच्या प्रभाग रचनेवर राजकीय प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

2017 मध्ये जनगणना व शासनाच्या निकषांनुसार समतोल साधणारी रचना होती. मात्र, सध्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काही प्रभागांमध्ये हेतुपुरस्सर तोडफोड करून अल्पसंख्याक, एससी आणि एसटी घटकांचे मतविभाजन होईल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Nashik)

राजकीय फायद्यासाठी समाजघटकांमध्ये फूट पाडण्याचा कुठलाही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक व न्याय्य प्रक्रिया राबवावी, अन्यथा सामाजिक सलोखा धोक्यात येईल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

या निवेदनप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक राज्य प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, उपमहानगर प्रमुख सुनील साळवे, उपजिल्हाध्यक्ष तुकाराम मोजड, युवक महासचिव दीपक पगारे, राहुल पटेकर, राजू गोतीस, विश्वनाथ भालेराव, सुरज गांगुर्डे, विशाल हिवराळे, युवराज मनेरे, रवी पगारे, शहराध्यक्ष युवक अतुल जाधव, करण दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Nashik)


       
Tags: नाशिकप्रभाग रचनामहापालिकावंचित बहुजनस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवपूर्वक साजरी; वंचित बहुजन आघाडीतर्फे पुतळ्यास अभिवादन

Next Post

कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

Next Post
बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !
बातमी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

by mosami kewat
September 21, 2026
0

- संजीव चांदोरकर वित्त भांडवलाच्या युगात, स्थापनेनंतर फक्त २५ वर्षाच्या कालावधीत पूर्ण देशभर फूटप्रिंट असणारा भागभांडवलाचा पंथ (  इक्विटी कल्ट) ...

Read moreDetails
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home