नांदेड : भारतीय बौद्ध महासभा, नांदेड उत्तर विभाग आणि समता सैनिक दलाच्या वतीने नुकतेच मुदखेड येथे समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होऊन समता सैनिक दलात सामील होण्याचा निर्धार केला.
मुदखेड येथील आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, मुदखेड तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य प्रशांत निखाते हे होते. या बैठकीचे उद्घाटन वंदनीय भंते गगनबोधी यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आनंदराव जोंधळे, मेजर आनंदराव झडते, आणि प्रकाश सोंडारे हे उपस्थित होते. उपस्थितांनी समता सैनिक दलाचे महत्त्व, उद्देश आणि कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले.
या बैठकीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यातून सामाजिक समता आणि शिस्तीसाठी काम करण्याच्या त्यांच्या निर्धाराचे दर्शन घडले.






