Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

mosami kewat by mosami kewat
August 17, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर : वंचित बहुजन युवा आघाडीने आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीत संघटनेच्या वाढीवर, वैचारिक भूमिकेवर आणि सामाजिक न्यायाच्या कार्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
‎
‎या मुलाखतीदरम्यान, अनेक तरुण कार्यकर्त्यांनी संघटनेला बळकट करण्यासाठी आपले विचार मांडले. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक न्याय व बहुजन चळवळीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन धोरणे आखण्यात आली.
‎
‎या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जिल्हा प्रभारी अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष दिपसागर (पंकज) पाराध्ये, जिल्ह्याचे नेते पॅंथर आतिश बनसोडे, युवा शहराध्यक्ष महेश (एम.जे.) जाधव, सचिव नरेंद्र शिंदे, सहसचिव चंद्रकांत सुरवसे, संघटक सौरभ चवरे व रितेश दुपारगुडे, जिल्हा सचिव दत्तात्रय कापुरे, तसेच वैभव भंडारे, अजय गाडे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‎
‎यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी अमोल लांडगे म्हणाले, “तरुण कार्यकर्त्यांचा ऊर्जासंपन्न सहभाग हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या उज्ज्वल भविष्याची ठोस खात्री देतो.” सोलापूर जिल्ह्यातील तरुणांचा उत्साह आणि संघटनेवरील विश्वास या बैठकीत स्पष्टपणे दिसून आला. या बैठकीमुळे युवा नेतृत्व अधिक एकजूट झाले असून, ते भविष्यात सशक्त राजकीय आणि सामाजिक भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: solapurVanchit Bahujan Yuva Aghadivbaforindia
Previous Post

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आवाहन देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

Next Post

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Next Post
अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!
बातमी

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

by mosami kewat
November 14, 2025
0

“अमेरिकेत सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या NRI वर तात्काळ कारवाई करा!”  अमरावती : अमेरिकेत भारताचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या विरोधात काही...

Read moreDetails
अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठी ‘इनकमिंग’; युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्यासह युवक कार्यकर्त्यांचा प्रवेश

अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठी ‘इनकमिंग’; युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्यासह युवक कार्यकर्त्यांचा प्रवेश

November 14, 2025
Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

November 13, 2025
“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!

“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!

November 13, 2025
जनधन खात्यांचा प्रश्न : खाती नाही, अर्थविश्व ‘डॉर्मंट’ आहे!

जनधन खात्यांचा प्रश्न : खाती नाही, अर्थविश्व ‘डॉर्मंट’ आहे!

November 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home