मविआच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल ह्या हेडलाईन ने #TV9मराठी ने एक बोगस बातमी चालवली आहे.अकोला लोकसभा मतदार संघात बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे ऐवजी इतर कुणी तरी आणि ईशान्य मुंबईत आंबेडकर असा हास्यास्पद दावा बातमी मध्ये आहे.
एक तर ह्या पोस्ट मध्ये जोडलेली tv9 च्या पत्रकाराला बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अकोला सारखा सुरक्षित मतदार संघ ते सोडून इतर ठिकाणी लढणार नाहीत. ही बाईट आठ दिवसा पूर्वीच tv9 ला दिलेला आहे. तरीही ‘अकोला लोकसभा मतदार संघात बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे ऐवजी इतर कुणी तरी आणि ईशान्य मुंबईत आंबेडकर’ असे वृत्तांकन अत्यंत बलिशपणा आहे. ज्यांनी कुणी यादी व्हायरल ची बातमी प्रकाशित केली आहे, राजकीय आघाडी करतांना, राजकीय पक्षाच्या बैठकीत मतदार संघाची चर्चा होत असते, उमेदवारी यादी घेवून वाटाघाटी होत नसतात, मग ती यादी कशी तयार होणार ? मविआ च्या बैठकीत वंचित कडून कुणीही नसतांना ते वंचित चे उमेदवार किंवा मतदारसंघ कसे ठरवू शकतात ? ही अत्यंत बेसिक आणि कॉमन सेन्स असलेली राजकीय प्रक्रिया माहिती नसलेले लोक tv9 कसे भरती करते ? ह्याचे नवल वाटते.
मुळात वंचित अद्याप मविआचा भाग नाही हे पक्षाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. केवळ उद्धवजी ठाकरे ह्यांचे पक्षा सोबत बोलणी होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अधिकृत घोषणा झाली आहे. सर्व मीडिया तिथे होता.
ही सर्व माहीती असतांना tv9 मराठीने आपली पत घालवणारी बातमी चालविली आहे. ह्या बातमी मूळे #YellowJournalism सोबत tv9 चे नाव जोडले गेले आहे. ह्याचा विचार tv9 मराठीने केला पाहिजे. ज्या कुणी अशी बातमी केली असेल त्यांना समज दिली जावी.
अकोला लोकसभेत लढणार की नाही हे फ़क्त बाळासाहेब आंबेडकर ठरवू शकतात, कुठल्याही सोम्या गोम्या ला हा अधिकार नाही. साहेबांनी दिलेल्या बाईट मध्ये हे स्पष्ट केल्यावर संभ्रम पसरविले जाणे ही अकलेची दिवाळखोरी आहे. त्यामुळे सदर चॅनेलवर अश्या कंडया पिकवू नये.
राजेंद्र पातोडे
अकोला