Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in क्रीडा, बातमी, मनोरंजन, सामाजिक
0
WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा
       

RCB Crowned WPL 2026 Champions: महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) दमदार कामगिरी करत दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. हा ऐतिहासिक क्रिकेट सामना बडोद्याच्या बीसीए स्टेडियममध्ये रंगला. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डब्ल्यूपीएलची फायनल पार पडली.  दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सनी पराभूत करत आरसीबीनं हा सामना आपल्या नावावर केला. अवघ्या 3 चेंडू शिल्लक असतानाच आरसीबीनं 204 धावांचं आव्हान पार केलं.

या ऐतिहासिक विजयाची शिलेदार ठरल्या कर्णधार स्मृती मानधना. तिनं खेळलेली 87 धावांची अप्रतिम खेळी आरसीबीच्या विजयाचा कणा ठरली. स्मृतीने मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीला पछाडत या चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तसेच स्मृतीने हरमनप्रीतच्या कॅप्टन म्हणून 2 ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरीही केली.

तिच्यासोबत जॉर्जिया व्हॉल हिनं 79 धावांची झुंजार खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव आणला. या दोघींच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबीनं चौथ्या पर्वात विजेतेपद पटकावलं.

दिल्लीची मोठी धावसंख्या, पण विजय नाही

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सनं 20 ओव्हरमध्ये 203 धावांचा डोंगर उभा केला. जेमिमा रॉड्रिग्ज हिनं 57 धावांचं अर्धशतक झळकावत संघाला भक्कम स्थितीत नेलं. तर लिजेल ली हिनं 37 धावा करत आक्रमक सुरुवात केली. शेवटच्या षटकांत वुलफार्टच्या फटकेबाजीमुळं दिल्लीने 200 चा टप्पा ओलांडला. मात्र, एवढी मोठी धावसंख्या असूनही दिल्लीला विजेतेपद गाठता आलं नाही.

डब्ल्यूपीएलची सुरुवात 2023 मध्ये झाली आणि यंदा स्पर्धेचा चौथा हंगाम पार पडला. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सनं सलग चार वेळा अंतिम फेरी गाठली, मात्र प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यंदाही विजेतेपदाचं स्वप्न अपूर्णच राहिलं.

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून आपली ताकद सिद्ध केली.


       
Tags: championcricketCriket teamDcMaharashtraMatch cricket match todaynewsrcbsmriti mandhanaVanchit Bahujan AaghadivbaforindiaWinnerwomensWomens cricketWpl
Previous Post

पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण: औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य याचिकेत दुरुस्तीचे आदेश; सुनावणी पुढील आठवड्यात

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण: औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य याचिकेत दुरुस्तीचे आदेश; सुनावणी पुढील आठवड्यात

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण: औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य याचिकेत दुरुस्तीचे आदेश; सुनावणी पुढील आठवड्यात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस
बातमी

धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

by mosami kewat
March 18, 2026
0

नवी दिल्ली / वॉशिंग्टन : भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या मूल्यांवरच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित...

Read moreDetails
दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

March 18, 2026
बँकांचे लाखो कोटी रुपये 'विल्फुल डिफॉल्टर्स'च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

बँकांचे लाखो कोटी रुपये ‘विल्फुल डिफॉल्टर्स’च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

March 18, 2026
अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

March 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home