Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 30, 2024
in राजकीय
0
दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

या वेळी अजेंड्याविषयी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थेत जो कर्मचारी आणि अधिकारी राबलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना 58 वर्षे वयापर्यंत निवृत्त करायचे नाही असा अजेंडा आमचा ठरत आहे. तसेच, महाराष्ट्रात एकंदरीत 14 लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आहेत. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ केली पाहिजे. पाच वर्षांत ती 22 लाखांवर गेली पाहिजे, तेव्हाच शासन व्यवस्थितरीत्या चालू शकते, असेही आंबेडकर म्हणाले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत.

मविआकडून तीन जागांपलीकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही

महाविकास आघाडीविषयी बोलताना आंबेडकर यांनी स्पष्ट केली की, आम्हाला मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

यावेळी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान उपस्थित होते.


       
Tags: bjpCongressmahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली ख्रिश्चन धर्मगुरू ग्रेशियस ओस्वाल्ड यांची भेट

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली ख्रिश्चन धर्मगुरू ग्रेशियस ओस्वाल्ड यांची भेट

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली ख्रिश्चन धर्मगुरू ग्रेशियस ओस्वाल्ड यांची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  
article

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

by mosami kewat
October 1, 2026
0

- संजीव चांदोरकर  एसआयआर च्या तांत्रिक बाबी , १३ कोटी नागरिकांची नावे वगळली जाणे , दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक...

Read moreDetails
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home