Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आपण प्रबुद्ध कधी होणार ?

Nitin Sakya by Nitin Sakya
January 1, 2022
in राजकीय
0
आपण प्रबुद्ध कधी होणार ?
       

जर बौद्धांना बाबासाहेबांची सारा भारत बौद्धमय करीन ही प्रतिज्ञा पुर्ण करायची असेल तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात उदा. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकार्य, राजकारण, खेळ, कला क्षेत्रात बौद्धांना स्वत:चा ठसा उमटावा लागणार आहे. परधर्मिय, परजातीय माणसांशी मानवतेच्या नात्याने जोडून घ्यावं लागणार आहे. बौद्धांची लढाई अधिक कठीण आहे कारण, हाताशी चमत्काराची काठी नाही.

कॉलेजला असताना एका केरळी वर्ग मैत्रिणीने ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. या बद्दल वर्गात खुप चर्चा व्हायची पण, ती तीच्या मागे. ती समोर असल्यावर कोणीही तीला काही विचारण्याची हिम्मत करत नसे. ती समोर असताना सगळे तिच्याशी नॉर्मल वागत असत. तीने ख्रिश्चन धर्म घेतला हे एका मुलीला न्युज पेपर मधली नाव बदलाची सुचना वाचुन समजले होते. आधी सर्वांना वाटले की, कदाचित तिने ख्रिश्चन मुलाशी लग्न करुन धर्म परिवर्तन केले असावे पण, नंतर समजले तसे काही नव्हते. तीच्या सगळ्या कुटूंबानेच धर्मांतर केले होते.

तीचं आधीचं नाव होतं कविता पिल्लै. धर्मांतरानंतर तीने ज्युना नाव धारण केलं. ज्युना पिल्लै. ज्युनाच्या वडीलांना पक्षघात झाला होता. तिचे वडीलच ब्रेड विनर असल्यामुळे या आजारपणाच्या उपचारात कुटूंब भिकेला लागायची वेळ आली होती. ज्युना आणि तीच्या दोन भावांच शिक्षण सुटायची वेळ आली होती. वडीलांना बरं करण्यासाठी ज्युनाची आई सगळे वैद्यकीय उपचार करुन थकली होती. सगळी जमापुंजी संपल्यामुळे ती घरकामं करु लागली. पण, ज्युनाच्या वडीलांच्या तब्येतीत फारसा फरक पडत नव्हता. ही बाब काही मिशनरींच्या लक्षात आली. ते एकदा ज्युनाच्या घरी गेले आणि त्यांनी ज्युनाच्या वडीलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करु देण्याची विनंती केली. ज्युनाला हा प्रकार पसंत नव्हता. ती स्वत: केरळी असल्यामुळे मिशनरी कशाप्रकारे काम करतात हे तीला माहीत होतं. तिने विरोध केला पण, तीच्या आईसमोर तीला ते मान्य कराव लागलं. दररोज ४-५ मिशनरी स्री-पुरुष संध्याकाळी ज्युनाच्या घरी येऊन येशुची प्रार्थना करु लागले. गप्पा गोष्टी करु लागले आणि जीजस बद्दल, त्याच्या चमत्काराबद्दल सांगु लागले. ज्युनाच्या कुटूंबियांना मदतही करु लागले. ज्युना व तीच्या भावांची शाळा, कॉलेजची फी भरली जाऊ लागली. ज्युनाच्या आईला वयाच्या चाळीशीत ANM नर्सिंग ट्रेनिंगला पाठवण्यात आलं आणि ट्रेनिंग पुर्ण केल्यावर जॉबसुद्धा लागला. प्रार्थनेचा हिप्नॉटीक परिणाम असावा कदाचित पण, ज्युनाच्या वडीलांचा चिडचिडेपणा कमी झाला. फिजिओथेरेपीला ते अधिक प्रतिसाद देऊ लागले. साधारण दोन वर्षांनी ते रडत-खडत का होईना हातात काठी घेऊन चालु लागले. ज्युनाचे आई-वडील मास प्रेयरला जाऊ लागले. चार वर्षांनी ते हातात काठी घेऊन मुंबई बाहेर प्रवास करु लागले. ज्युनाच्या मनात असणारा मिशनरींबद्दलचा राग कमी कमी होत गेला. एक दिवस तीच्या वडीलांच्या हातातली काठीसुद्धा निघून गेली. त्यांनी सहकुटूंब धर्मांतर केले. नवरा स्वत:च्या पायावर चालु लागला तर मी कुटूंबासोबत तुला शरण येऊन ख्रिश्चन होऊ असा नवस ज्युनाच्या आईने माउंट मेरीला आणि वसईला कुठल्या तरी चर्चमध्ये केला होता.

एकदा मनोरी आयलंडला कॉलेजची ट्रीप गेली तेव्हा ज्युनाने हे सगळं मला सांगितलं. तु चमत्काराला भुलून ख्रिश्चन झालीस का? असा प्रश्न मी तीला विचारला. ती म्हणाली तीचे वडील पॅरालीसीसेमध्ये बरे होऊन स्वत:च्या पायावर चालु लागले हा चमत्कार की काय नाही सांगु शकत पण, या सगळ्या कठीण काळात चर्चचे लोक ज्या प्रकारे तिच्या कुटूंबाच्या पाठीशी उभे राहीले त्यामुळे तिच्या कुटूंबियांना खूप मोठा आधार मिळाला. तो आधार मिळाला नसता तर त्यांच्या कुटूंबाची दाणादाण उडाली असती. वडीलांचे उपचार, भावाचं आणि तिचं शिक्षण झालं नसतं. आज तिची आई स्वत:च्या पायावर उभी राहू शकली नसती. तीचं म्हणणं होतं की, तिला मिशनरींमुळे जीवन जगण्याचा मार्ग सापडला आहे. दुस-यांना अडचणीच्या काळात मदत करणं, दुस-यांवर प्रेम करणं हाच जीवनाचा उद्देश आहे कारण, त्यातुनच आपल्याला आनंद आणि इतरांचं प्रेम मिळतं. चर्च मला हा उद्देश जगण्याची संधी देत. मी ज्युनाला विचारलं तु नन होणार आहेस का? ती म्हणाली तीला परदेशात थिऑसॉफीत पोस्ट-ग्रॅज्युएशन करण्याची संधी आहे पण त्यावर तीने अजून निर्णय घेतलेला नाही.

ख्रिस्ती मिशनरींवर चमत्कार करुन धर्मांतर करत असल्याचा आरोप केला जातो पण, लोक केवळ चमत्काराला भुलून धर्मांतर करतात हा आरोप ज्युनाला मान्य नव्हता. मिशनरी लोक अडचणीच्या काळात लोकांना धीर देतात, आधार देतात, मदत करतात हे धर्मांतराच सर्वात मोठं कारण आहे असं तीचं म्हणनं होतं. ज्युना जरी रोज प्रार्थना करत असली तरी तीचा चमत्कारांवर फारसा विश्वास असल्याचे जाणवत नव्हते. प्रार्थनेमुळे मनाला शांतता आणि धीर लाभतो, एक काही तरी सर्वोच्च शक्ती आपल्या पाठीशी असल्याची भावना मनात निर्माण होऊन मनात नवी ऊमेद निर्माण होते असं तीचं म्हणणं होतं. आदिवासी थेट चमत्काराला भुलून धर्मांतर करत नाही, तर असे चमत्कार करण्याच्या कित्येक आधी मिशनरी लोक आदीवासींना वैद्यकीय सुविधा पुरवतात, शिक्षण देतात आणि अडचणीच्या काळात मदत सुद्धा करतात. ही सुप्त क्रांती आहे जी अविरत सुरु असते. पी.एल. लोखंडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, रमाबाई कॉलनी परिसरात अनेक बौद्ध कुटूंब ख्रिस्ती धर्म स्विकारत आहेत याचं सर्वात महत्वाचं कारण ख्रिस्ती मिशनरी लोक या अडचणीत सापडलेल्या लोकांपर्यंत पोहचतात. त्यांच्या अडचणी दुर करतात.

ख्रिश्चन मिशनरीसारखे काम करणारे दुसरे लोक म्हणजे आरएसएसचे लोक. दुर्गम भागात, खेडोपाडी हे लोक पोहचतात पण यांच्यात आणि मिशनरींमधे महत्त्वाचा फरक म्हणजे आरएसएसच्या संपर्कात आलेले दलित, आदिवासी त्यांच्याही नकळत मुस्लीम आणि बौद्ध द्वेष्टे होतात. धर्मांतरीत ख्रिस्ती लोकं बाबासाहेबांचे उपकार मान्य करत नाहीत असा एक मोठा आक्षेप बौद्ध लोकं घेतात पण, मुळात अशी जबरदस्ती आपण कोणावरही करु शकत नाही. ज्याला बाबासाहेबांच्या कार्याचं महत्व समजतं तो माणुस नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञच राहील. अनेक धर्मांतरीत ख्रिस्ती तरुण बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता बाळगून असल्याचा माझा अनुभव आहे.

जर बौद्धांना बाबासाहेबांची सारा भारत बौद्धमय करीन ही प्रतिज्ञा पुर्ण करायची असेल तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात उदा. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकार्य, राजकारण, खेळ, कला क्षेत्रात बौद्धांना स्वत:चा ठसा उमटावा लागणार आहे. परधर्मिय, परजातीय माणसांशी मानवतेच्या नात्याने जोडून घ्यावं लागणार आहे. बौद्धांची लढाई अधिक कठीण आहे कारण, हाताशी चमत्काराची काठी नाही. त्यामुळे सेवाकार्य, व्यापक सामाजिक आणि राजकीय दृष्टी हेच इतरांशी जोडून घेण्याचे मार्ग आहेत. मी स्वत: बौद्ध असलो आणि भगवान बुद्ध माझे रोल मॉडेल असले तरी धम्मातलं कर्मकांड मला मान्य नाही. पाच फळ, पांढरा धागा बांधणं या गोष्टी प्रतिकात्मक असल्या, तरी मला मान्य नाहीत. अनेकांना हा अतिशहाणपणा वाटू शकतो पण, मला हाच बुद्धाला हवा असलेला शहाणपणा वाटतो कारण, बुद्ध मुर्तीत नाही तर धम्म आचरणात आहे. बुद्धाने कधीही अडचणीत असलेल्या माणसाला आधी पंचशिल, त्रिसरण ग्रहण कर असा आग्रह केलेला नाही. महापरित्राण पाठ म्हण असा सल्ला दिलेला नाही. बुद्धाने लोकांना शहाणं केल. ते शहाणपण ज्या गाथांमधे संकलित करण्यात आलं त्याच गाथांचं कर्मकांड झालं. बुद्धाचा धम्म अतिशय साधा आणि सोपा आहे. तुम्हाला दुस-यांकडून ज्या वर्तनाची अपेक्षा असते तोच वर्तन-व्यवहार तुम्ही इतरांशी करा. चुकीच्या सामाजिक रुढी-परंपरांबाबत स्वत: शहाणं व्हा आणि लोकांना पण, शहाणं करा. बुद्ध समजुन घेणं खुप सोपं आहे. बौद्ध माणसाला बौद्ध असल्याचा गर्व कधीच नसतो पण, बौद्ध असणं म्हणजे नेमकं काय? याचं भान मात्र अवश्य असत. त्यांच्या वर्तन आणि वाणीतुन ते भान प्रकट होत असतं. तुम्ही जेवढे कट्टर बौद्ध होता, तेवढे बुद्धाच्या मार्गापासून दुर जाता. बुद्ध महत्वाचा नाही, तर बुद्धाचा मार्ग जास्त महत्त्वाचा आहे हे भान असणं म्हणजे बौद्ध असणं. हे भान असलेला माणूस कर्मकांडात अडकुन स्वत:च कटरत्त्व सिद्ध करण्याऐवजी बुद्धाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत बुद्ध मुर्ती ऐवजी बुद्धप्रतिकं प्रचलित होती, तेव्हा धम्म उत्कर्षाला होता. जेव्हा बुद्ध मुर्ती निर्माण झाली, बुद्ध प्रतिकांना मानवी चेहरा प्रदान करण्यात आला तेव्हापासून लोक बुद्धाच्या शिकवणीपासून दुर गेले. बुद्वाला पुजणारे लोक मग इतर मुर्त्यांना पुजू लागले.

थोडंसं विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व पण, ख्रिस्ती मिशनरींमुळे धर्मांतर करत असलेले लोक पाहून चडफड करणारे, पिटर कांबळेची खिल्ली उडवणारे लोक धम्माच्या काहीही कामाचे नाहीत. मिशनरींना जर उत्तर द्यायचं असेल, तर त्यांच्या सारखंच लोकांना जोडून घेण्याचं काम करावं लागेल.

एस धम्मो सनंतनो.

  • साक्या नितीन

       
Tags: BuddhistPrabuddhaप्रबुद्धबौद्धबौद्धमय भारत
Previous Post

विषमतावादी व्यवस्थेची मांडणी आणि बाबासाहेबांच्या भूमिका

Next Post

आरपीआय गटातील अनेकांचा वंचितमध्ये प्रवेश !

Next Post

आरपीआय गटातील अनेकांचा वंचितमध्ये प्रवेश !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"
बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

by Tanvi Gurav
July 17, 2025
0

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025
सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home