मुंबई : मी काल चीन आणि पाकिस्तान संदर्भात जी चिंता व्यक्त केली होती ती आज भारतीय वायुसेनेच्या एअर चीफ मार्शल यांनी पुन्हा अधोरेखित केली आहे. असे म्हणत 56 इंच काय करत आहे, असा सवाल पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल ए.पी सिंग यांनी देशात लढाऊ विमानांच्या कमतरतेवर चिंता व्यक्त केली आहे. हवाई दल प्रमुख एपी सिंग म्हणाले, “चीन सहाव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट तयार करत आहे.
काही दिवसांपूर्वी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आम्हाला आमच्या उत्तर आणि पश्चिम शेजाऱ्यांची काळजी वाटत आहे. त्यामुळे आम्हाला इतर संसाधनांचा विचार करावा लागेल, याची गरज असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.