Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 19, 2024
in राजकीय
0
वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरीच्या सभेतुन आश्वासन

दिंडोरी : इथल्या शिवसेनेच्या खासदाराने संसदेत कधीच मागणी केली नाही की, राफेल विमानांची निर्मिती ओझरच्या एचएएलच्या कारखान्यात करण्यात यावी. या कारखान्यात लढाऊ विमाने बनवायचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथून ‘वंचित’चा उमेदवार निवडून आल्यास या माध्यमातून आम्ही इथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊ, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती ढोमसे यांच्या प्रचारार्थ आयोजित पिंपळगाव बसवंत येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, ओझरमध्ये HAL हा विमान निर्मितीचा शासकीय कारखाना आहे. भारताने राफेल विमान खरेदीचा करार केला होता, तेव्हा 100 विमाने भारतात तयार होतील, असा निर्णय झाला होता. त्यावेळी सर्वांची मागणी होती की, देशभरातील एचएएलच्या कारखान्यात ह्या लढाऊ विमानांची निर्मिती व्हावी मात्र, पंतप्रधान मोदीने हे विमाने बनवायचे कंत्राट अनिल अंबानीला दिले. मात्र, अनिल अंबानीला लढाऊ विमाने बनवायचा कोणताही अनुभव नाही. हा विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे? हेही लोकांनां माहिती नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली.

जो कोणी व्यापारी शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव देईल, त्याला शिक्षा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन देशात केले होते. पण, मोदीने हा कायदा केला नाही. आम्ही सत्तेत आल्यास हा कायदा करू.

कांदा उत्पादकांचे महाराष्ट्र हे आगार आहे. पण, राज्यातील आणि या भागातील शेतकऱ्याला केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडलय. गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी मोदीने देशातील शेतकरी मारला. गुजराती शेतकऱ्याला कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आणि महाराष्ट्रातील शेतकरी मारला.

भाव खाली – वर करणे हे व्यापारी आणि सरकारचा खेळ आहे. मालतीताई दिंडोरी मतदारसंघातून निवडून आल्यास सर्वात आधी कांद्याचे धोरण ठरवतील.

काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव 15 रुपये किलोवरून 150 रुपये किलोपर्यंत अचानकपणे गेले होते. हा कृत्रिम तुटवडा व्यापाऱ्यांनी निर्माण केला होता. यातून व्यापाऱ्यांनी 45 हजार कोटी रुपये काही महिन्यात सामान्य लोकांकडून लुटले.

हा तुटवडा सरकारमान्य होता. त्याचा पैशांतून ते मतं विकत घ्यायची गोष्टी करताय.

मोदी देशाचा पंतप्रधान आहे की गुजरातचा ?

कांदा प्रश्नी सरकार निर्यात धोरण आखत नाहीये. गुजरातमधील व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे आणि देशातील इतर व्यापारी, शेतकरी मरायला सोडला. मोदी देशाचा पंतप्रधान आहे की गुजरातचा आहे? ज्याने फक्त गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा केला.


       
Tags: DindoriLoksabhaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

काँग्रेसच्या साजिद पठाण खानविरोधात तक्रार दाखल

Next Post

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

Next Post
शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा
बातमी

युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

by mosami kewat
November 16, 2025
0

अकोला : अकोला येथील सर्किट हाऊस येथे युवा समिती धनगर समाजाच्या वतीने गाव प्रमुखांची महत्वपूर्ण एल्गार बैठक पार पडली. समाजातील...

Read moreDetails
गजानन एकबोटे यांनी प्रा. दिलीप चव्हाण यांचा लेख चोरला?

गजानन एकबोटे यांनी प्रा. दिलीप चव्हाण यांचा लेख चोरला?

November 16, 2025
वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी!

वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी!

November 16, 2025
बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित

बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित

November 16, 2025
ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

November 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home