Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

मतदानाच्या माध्यमातून आपल्याला कृती करायची आहे : ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 5, 2024
in राजकीय
0
मतदानाच्या माध्यमातून आपल्याला कृती करायची आहे : ॲड. प्रकाश आंबेडकर
       

अकोला येथे नामांकन रॅलीत उसळला जनसागर

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, आपण बोलतच आलो आहोत. पण, आता आपल्याला मतदानाच्या माध्यमातून कृती करायची आहे. त्यामुळे २० दिवस सर्व कामे बाजूला ठेवून, निवडणुकीच्या प्रचारात आपण असले पाहिजे.

आंबेडकर म्हणाले, ज्या बुथ कमिट्या झाल्या आहेत. त्यांनी आपापले बुथ सांभाळले पाहिजे. जो मतदार मत देणारा आहे. त्याला बुथपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. जो पक्षाचा कार्यक्रम आहे. तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवायची गरज आहे, या सगळ्या गोष्टी आपण कराल ही अपेक्षा बाळगतो. तसेच, उद्याचा असणारा विजय आपण खेचून आणाल अशी जिद्द आपण सगळे बाळगूया, असे म्हणत त्यांनी जनतेवरचा विश्वास व्यक्त केला. या वेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नवीन गीताचे उद् घाटन करण्यात आले. या पक्षाच्या नव्या गीताचे उपस्थितांनी जल्लोष करून स्वागत केले. नामांकन रॅलीत ॲड. आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी हजारो अकोलाकरांनी  मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या रॅलीत सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित होते. या रॅलीमध्ये मी माळी, मी मुस्लिम, मी गरीब मराठा, मी धनगर, मी कुणबी, मी विद्यार्थी असे फलक दिसून आले.

तसेच, या प्रसंगी आंबेडकर यांच्यासह, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, नीलेश विश्वकर्मा, गोविंद दळवी, बालाजी शिंदे, सुभाष रवंदळे, हमराज उईके, अफसर खान, संगीताताई आढाव,  प्रतिभाताई शिरसाट, प्रमोद देंडगे, मिलिंद इंगळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AkolaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उपकाराची पद भोगलेल्यांनी बाळासाहेबांबद्दल बोलू नये.!

Next Post

लातूरमधून नरसिंग उदगीरकर यांना वंचितकडून उमेदवारी

Next Post
लातूरमधून नरसिंग उदगीरकर यांना वंचितकडून उमेदवारी

लातूरमधून नरसिंग उदगीरकर यांना वंचितकडून उमेदवारी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home