Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
       

विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन

औरंगाबाद: “आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या प्रतिनिधींना सत्तेत पाठवावे लागेल,” असे ठाम प्रतिपादन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पालोद (सिल्लोड) येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. (Sujat ambedkar)

सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे धोरण आणि आगामी काळातील विकासाचा आराखडा सविस्तरपणे मांडला. “सत्ता ही केवळ सत्तेसाठी नसून ती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी असते,” असे सांगत त्यांनी ग्रामीण भागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचे आश्वासन दिले.

वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास पुढील प्रमुख निर्णय राबवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण करून डिजिटल सुविधा, प्रशिक्षित शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, प्रत्येक गावात सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून गरीब व वंचितांना मोफत आणि वेळेवर उपचार मिळतील याची व्यवस्था केली जाईल, शेतकऱ्यांना पिकांना योग्य हमीभाव, प्रभावी पीकविमा योजना आणि नैसर्गिक आपत्तीत तात्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ठोस धोरण राबवले जाईल, प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वीज व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. (Sujat ambedkar)

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष अंजन साळवे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. सिल्लोड तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या नागरिकांनी सभास्थळी मोठी गर्दी केली होती. सभेतील उत्साह आणि जनतेचा प्रतिसाद पाहता, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे स्पष्टपणे दिसून आले.


       
Tags: aurangabadElectionElection campaignElection newsLocal body electionMaharashtraPoliticalpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadivbaforindiavoteZilla parishad champingZp election
Previous Post

चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post

पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!

Next Post
पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!

पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home