Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

mosami kewat by mosami kewat
March 26, 2026
in अर्थ विषयक
0
युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट
       

– संजीव चांदोरकर 

“तू ढील दे, मी खेचत राहतो” अशी मिलीभगत आहे डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांची. 

इराणवर हल्ले सुरू ठेवायचे का नाही याबद्दल अमेरिका आणि इस्रायल किंवा खरेतर ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्यामध्ये मतभेद आहेत असे narrative सेट केले जात आहे. 

तसे ते नाहीये. दोघांनी रोल विभागून घेतला आहे.

दोघांनी मिळून इराणवर एकाचवेळी ठरवून हल्ला केला असेल तर, पाच दिवस हल्ले तहकूबीची घोषणा देखील ट्रम्प आणि नेत्यानाहू या दोघांनी मिळून करायला हवी होती. ती फक्त ट्रम्प यांनी केली याचे अर्थ लावले पाहिजेत. 

वाढता आंतरराष्ट्रीय दबाव, अमेरिकेत येणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये देशांतर्गत मतदारसंघ आणि खुद्द “मागा” आंदोलनातील मतभेद…. यांना तात्पुरते थंड करण्यासाठी ट्रम्प यांनी ती पाच दिवसांची घोषणा केली. 

नेत्यानाहू यांनी हल्ले सुरू ठेवले. अजून धारदार केले. 

कारण इराणचे कायमचे कंबरडे मोडायचे, तेथील तेल, ज्यातून इराणला आर्थिक ऊर्जा मिळते ते कायमचे उध्वस्त करायचे, मिळेल ती नेतृत्वाची फळी मारून टाकायची की तेथे अराजक माजेल….हे ट्रम्प आणि नेत्यानाहू यांचे उद्दिष्ट आहे. 

युद्ध थांबेल तेव्हा थांबेल. पण वाटाघाटींच्या टेबलवर इराण आत्मसन्मान ठेवून बसणार की शरणागत होऊन पायाशी बसून याचना करणार….हा सर्वात कळीचा प्रश्न आहे. 

ट्रम्प आणि नेत्यानाहू यांना दुसरा प्रकार हवा आहे. 

दोन दिवसांनी पाच दिवस संपल्यानंतर ट्रम्प यांनी अजून काही दिवस वाढवले तरी आश्चर्य वाटायला नको. 

हे युद्ध दोन राष्ट्रांमधला इश्यू असता तर आपण एवढी चिरफाड करण्याची गरज लागली नसती कदाचित. 

पण हे वेगळे प्रकरण आहे. त्याच्या झळा जगातील/  भारतातील कोट्यवधी कुटुंबांना डायरेक्ट आताच बसत आहेत. युद्ध औपचारिक रित्या समजा थांबलेच तरी बसत राहू शकतात. म्हणून तो आपला देखील विषय आहे. 

war-game-or-role-play-trump-netanyahu-iran-shadow


       
Tags: Americandonald trampEconomicIran Israel War
Previous Post

मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

नागपूरची ठिणगी !

Next Post
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी
बातमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

by mosami kewat
March 26, 2026
0

आंध्र प्रदेश : मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरम परिसरात गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. खासगी ट्रॅव्हल्सची बस आणि डंपर यांच्यात झालेल्या...

Read moreDetails
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026
युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

March 26, 2026
मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 26, 2026
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास क्षेत्रावर शोककळा

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home