अकोला : पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी झटणारया व्हाईस ऑफ मीडीया संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यासाठी गुरूवारी राज्यभरात धरणे देण्यात आले. या आंदोलनास पाठिंबा देत अकोल्यातील व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारीही सहभागी झालेत. आपल्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता धरणे दिलेत. धरणे आंदोलनानंतर पत्रकारांनी प्रभारी निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांना निवेदन सादर केले.पत्रकारांच्या भावना शासन दरबारी पोहोचविण्याचे आश्वासन घुगे यांनी यावेळी दिले.
पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देशपातळीवर पुढे सरसावलेल्या व्हाईस ऑफ मीडीयाच्या नेतृत्वात गुरूवारी राज्यभरात एकाचंवेळी धरणे आंदोलन छेडले गेले. व्हाईस ऑफ मीडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या पुढाकारात छेडण्यात आलेल्या आंदोलनास राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 44 डीग्री तपमान असूनही अको्ल्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिलीत .पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकां इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. आदी प्रमुख मागण्यासाठी धरणे दिले गेले. धरणे आंदोलनात व्हाईस ऑफ मीडीयाचे अकोला जिल्हाध्यक्ष संजय खांडेकर, कार्याध्यक्ष रूबेन वाळके, विजय केंदरकर ,उपाध्यक्ष दीपक उपाध्याय, सरचिटणीस विमल जैन ,सहसरचिटणीस अनूप ताले,कोषाध्यक्ष ॲड. समीरसिंग ठाकूर, कार्यवाहक :प्रमोद मोहरील, मनोहर मानकर, संघटक विलास देशमुख, प्रवक्ता उमेश अलोणे, प्रचारक ओलवे, महानगराध्यक्ष धनंजय साबळे, उपाध्यक्ष श्रीकांत राऊत सरचिटणीस मधु कसबे, कोषाध्यक्ष विष्णू गावंडे, मुकेश ढोके, दीपक गवई, कार्यवाहक विशाल पुरंदरे, वर्षा मोरे, संजय सोनार, संतोष जुमळे, सत्यशीला बन्सोड आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.