कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात एका मोठ्या ‘विजयी संकल्प महासभा’ चे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या (दि. १७) दुपारी ३ वाजता कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानावर विजयी ‘संकल्प महासभा’ होणार आहे. यावेळी विजयी संकल्प महासभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर नागरिकांना संबोधित करणार आहेत.
या महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.वंचित बहुजन आघाडीच्या या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.






