नाशिक : इगतपुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. पाडळी दे येथील श्री हरी ओम हॉटेलमध्ये झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे होते. या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय साबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भारत बुकाणे, विश्वनाथ भालेराव, जिल्हा संघटक दीपक भंडारी, जिल्हा महासचिव विनय कटारे, विक्रम जगताप, संतोष उबाळे, संदीप काकळीज, दिनेश गायकवाड, नाशिक युवा अध्यक्ष विकी वाकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत तालुका कार्यकारिणी, युवक तालुका, शहर कार्यकारिणी, गटप्रमुख आणि गणप्रमुख यांची नेमणूक करण्यावर चर्चा झाली. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शेतकरी आणि अन्याय-अत्याचारांच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यावरही भर देण्यात आला. या बैठकीनंतर पक्ष निरीक्षक मधुकर कडलक आणि विलास गुंजाळ यांनी तालुक्यातील इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. गोंदे दुमाला औद्योगिक ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे, युवा नेते चंद्रकांत सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष हनुमंत साबळे, युवा उपाध्यक्ष विनोद बागुल, ज्येष्ठ नेते तुळशीराम शिंदे, युवा तालुका संघटक युवराज सोनवणे, दीपक शिरसाठ आणि शांताराम जगताप यांनी या बैठकीचे यशस्वी आयोजन केले.
बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!
पुणे: बांधकाम कामगार आणि श्रमिकांना संघटित करणारी महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या बांधकाम कामगार श्रमिक सेना (महाराष्ट्र राज्य) या संघटनेने वंचित बहुजन...
Read moreDetails






