Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणात चोख प्रत्युत्तर देऊ – वंचित बहूजन युवा आघाडी.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 28, 2023
in बातमी
0
मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणात चोख प्रत्युत्तर देऊ – वंचित बहूजन युवा आघाडी.
       

काल वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वार्ड अध्यक्ष गौतम हराळ ह्यांचेवर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला असून युवा आघाडी ह्याचे चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा वंचित युवा आघाडीने दिला आहे.

२७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित चे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष श्री. परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपरने जीवघेणा हल्ला केला आहे.वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ह्याचा निषेध करण्यात येत असून राज्यभर आज युवा आघाडी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देणार असून आरोपी आणि सूत्रधार जगदीश गायकवाड टोळीला अटक करण्याची मागणी करणार आहे.

हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. पक्ष नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्या संबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड आणि टोळी ह्या हल्यात सहभागी असल्याचा आरोप युवा आघाडीने केला आहे.

ह्या बाबतीत आज युवा आघाडीच्या सर्व जिल्हा तालुका आणि शहर कमिटी च्या वतीने तातडीने आपल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये गृह मंत्री महाराष्ट्र ह्यांना निवेदने देण्यात येणार आहेत.

ह्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर ह्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी.तसेच हल्ला प्रकरणात तातडीने आरोपींना अटक व्हावी, हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या जगदीश गायकवाड आणि टोळीला अटक करण्यात यावी, त्यांचेवर कलम 307 सह संघटित गुन्हेगारी चे कलम (मकोका) लावून त्याचे अवैध संपत्ती बाबत महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीने दिलेल्या तक्रारी नुसार सीबीआय आणि ईडी कडून चौकशी होऊन त्याची अवैध संपत्ती जप्त करण्यात यावी.अश्या मागण्या करण्यात येणार आहेत.

गृहमंत्री ह्यांना सर्व पोलीस ठाण्या मार्फत निवेदन देऊन दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास राज्यभर युवा आघाडी आंदोलन करेल असा इशारा देखील युवा आघाडीने दिला आहे.

हा हल्ला मुंबई अध्यक्ष ह्यांचे वर नसून आंबेडकर भवन वर झालेला हल्ला आहे, वंचित बहूजन युवा आघाडी कडून ह्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देखील वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून देण्यात आला आहे.

डॉ निलेश विश्वकर्मा
प्रदेश अध्यक्ष

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव

राज्य कार्यकारणी सद्स्य – अमित भुईगळ, शमीभा पाटील, ऋषिकेश नांगरे ,
पाटील, अक्षय बनसोडे,चेतन गांगुर्डे, विशाल गवळी, विनय भांगे, अमोल लांडगे, अफरोज मुल्ला, सूचित गायकवाड, अमन धांगे

वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश.


       
Tags: Jagdish GaikwadmumbaiParmeshwar RanshurVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

टीव्ही9 ची ही कसली पत्रकारिता !

Next Post

राजदंडाची स्थापना म्हणजे हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी?

Next Post
राजदंडाची स्थापना म्हणजे हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी?

राजदंडाची स्थापना म्हणजे हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
बातमी

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

by mosami kewat
September 16, 2025
0

मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...

Read moreDetails
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

September 16, 2025
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका

September 16, 2025
मोदी "द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!" ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

September 16, 2025
बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home