दर्यापूर येथील बस स्थानक चौक ते जुनी नगर परिषद पर्यंतची कडुलिंबाची 40 झाडे तोडण्याचा दर्यापूर नगरपरिषद यांनी ठराव घेण्यात आला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस एकूण चाळीस जुनी झाडे आहेत. हा रस्ता दर्यापूर शहरातील मुख्य नसून या झाडांमुळे वाहतुकीस कोणत्याही प्रकारची अडचण वा आजपर्यंत नुकसान ग्रस्थ अपघात झाला नाही.या रस्त्यावरून ज्या प्रमाणे वाहतूक चालते त्या प्रमाणे वाटसरू देखील मोठ्या प्रमाणात जाणे येणे करतात, ह्या झाडांमुळे वाटसरूंना विसावा मिळतो, सावली मिळते तसेच झाडाच्या फांद्या व खोड फार जुने झालेली दिलेली नाहीत ती जी तुटून रस्त्यावर पडून हानी होईल.
सद्यस्थितीत कोरोना संसर्गचा वाढता प्रादुर्भाव तसेच वृक्षतोड व निसर्गाच्या झालेल्या ऱ्हासामुळे आज अनेक संकटाना या परिस्थितीत सर्वाना समोर लागत आहे. कडुलिंब हे वृक्ष औषधायुक्त असून यामुळे शुद्ध हवा, घनदाट छाया आणि उपयुक्त ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळण्यास मदत होते तरी आपणास विनती आहे की, नूतनीकरन्याच्या, सौंदर्यीकरण्याच्या पेक्षा उक्त सर्व बाबींचा विचार करावा ज्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही. COVID-19 चा प्रादुर्भाव बघता जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर देण्यात यावा. ज्या झाडांमुळे कुठल्याही प्रकारची आपत्ती/जीवितास बाधक नसलेल्या झाडांना तोडू नये जर झाडे तोडण्यात येतील तर सदर बाबींवर गंभीर विचार करून होणाऱ्या परिणांमाना आपण जबाबदार राहाल.
चिपको आंदोलन केले तसेच नगरपरिषदचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले.साहेबराव देविदासजी वाकपांजर जिल्हामहासचिव वंचित बहुजन आघाडी अमरावती, संजीवन खंडारे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दर्यापूर, अंकुश वाकपांजर जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, ब्रम्हनंद गावंडे सर्कल प्रमुख येवदा, चेतन कांबळे, यश कांबळे,दिपक शिंदे, प्रदीप चक्रनारायण शहरातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.