औरंगाबाद : नारेगाव येथील मुस्लिम समाजासाठी दफनभूमी (कब्रस्तान) उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.या उपोषणाचे नेतृत्व युवा आघाडीचे आफसर पठाण आणि समस्त नारेगाव रहिवासी करत आहेत.
नारेगाव येथील मुस्लिम समाजाला दफनविधीसाठी जागा नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या तातडीने सोडवून कब्रस्तानाची मागणी पूर्ण करावी, अशी आंदोलकांची भूमिका आहे.
जोपर्यंत प्रशासनाकडून मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी औरंगाबाद महानगर पालिका समोर रुपचंद गाडेकर, पंकज बनसोडे, संदीप जाधव, राहुल मकासरे, प्रशांत बोराडे, मतीन पटेल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.






