Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ठामपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्वाधिक जागांवर महिलांना संधी देणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
ठामपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्वाधिक जागांवर महिलांना संधी देणार
       

ठाणे – ठाणे (Thane) महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीमध्ये वंचितकडून महिलांना सर्वाधिक जागांवर संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत, शहराध्यक्ष महेंद्र अनभोरे यांनी दिली.

ठाणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया कांबळे, महासचिव जयवंत बैले, युवा आघाडीचे संतोष कोरके, रेखा कुरवरे, मोहन नाईक, अशोक अहिरे आदी उपस्थित होते.

भगत यांनी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगली मते घेतले आहेत. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा मनोदय आहे. त्यादृष्टीने पक्षाची बांधणी पूर्ण झाली आहे. वंचित समाजघटकातील महिलांना सर्वाधिक संधी देऊन त्यांना महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत. या आदेशांचे पालन करण्यात येईल. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या विषयांवर वंचित बहुजन आघाडी जनतेसमोर जाणार आहे.

मनसेने ठाणे विकास आघाडीचा प्रस्ताव दिला आहे का, याबाबत विचारले असता, अद्याप तसा कोणताही प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे आलेला नाही. मात्र, तसा प्रस्ताव आला तरी अ‍ॅड. आंबेडकर हेच त्याबाबत निर्णय घेतील, असेही भगत यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनुप मित्रा यांच्यासह संदीप खरात, उमेश दुबे, पंडागळे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. यावेळी ठाणे शहराची 47 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


       
Tags: ThaneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रभाग पद्धती कायद्यावर लक्षवेधी निर्णय होण्याची शक्यता – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

देशातील पत्रकारितेला आयाम देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते – प्रा. डॉ. रविंद्र मुंद्रे

Next Post
देशातील पत्रकारितेला आयाम देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते – प्रा. डॉ. रविंद्र मुंद्रे

देशातील पत्रकारितेला आयाम देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते - प्रा. डॉ. रविंद्र मुंद्रे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश
बातमी

वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश

by mosami kewat
November 24, 2025
0

विरार : वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र...

Read moreDetails
संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 साठी वंचित बहुजन आघाडी “संगमनेर सेवा समिती” सोबत काम करणार!

संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 साठी वंचित बहुजन आघाडी “संगमनेर सेवा समिती” सोबत काम करणार!

November 23, 2025
इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!

इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!

November 23, 2025
बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर

बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर

November 23, 2025
पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

November 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home