पिंपरी-चिंचवड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड येथे उद्या, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी एक भव्य ‘निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंती निमित्ताने ‘एक संधी वंचितला’ या नावाने ही सभा आयोजित करण्यात आली आहे. ही केवळ एक सभा नसून, बहुजनांच्या हक्कांसाठीचा निर्धार सभा आहे. उद्या सायंकाळी ४ वाजता पिंपरी चिंचवडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी), मागील मैदान निर्धार सभा होणार आहे.
या भव्य सभेत ॲड. बाळासाहेब आंबेडकर नागरिकांना संबोधित करणार आहे. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून, शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व ताकद द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.





