रस्त्यासाठी भाऊराव तेलगोटे आलेगांव ता. पातुर ह्यांचे आठ दिवसा पासून सुरू असलेले उपोषण वंचित पदाधिकारी ह्यांनी सोडविले.
पातूर : घराकडे जाणारा रस्ता अडविण्यात आल्याने कुटुंबासह उपोषण करणारे ७५ वर्षीय भाऊराव तेलगोटे हे आठ दिवसापासून उपोषणाला बसले होते. वंचित चे पदाधिकारी राजेंद्र पातोडे,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, हिरासिंग राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, दिनकर खंडारे, मंगेश गवई, धर्मेंद्र दंदी, आनंद खंडारे, सुमेध खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य विभाग) जि.प.अकोला यांचे मध्यस्थी नुसार रस्त्याच्या ‘मागणी बाबत संबंधीतांना नोटिस बजावण्यात आल्या असुन सदर विषय हा ग्रा.प. मासीक सभा दि.२९/०८/२०२२ ठराव क्रं. ७ नुसार चर्चला घेण्यात आला आहे.असे पत्र ग्रामसेवक ह्यांनी दिले. त्यानुसार कायदेशिर बाबी १५ दिवसाच्या आत पुर्ण करुन योग्य तो न्याय ग्राम पंचायत स्तरावर देण्यात येईल. तरी आज रोजी आपण चालु असलेले उपोषन मागे घेण्यात यावे. हि विनंती, ग्रामपंचायतने केली. त्यानुसार तेलगोटे ह्यांना पत्र आणि शरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले.