Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा!

mosami kewat by mosami kewat
July 22, 2025
in बातमी
0
सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा!

सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा!

वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी!

मुंबई : राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येतच. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे.

या देशाने आजपर्यंत दुधाच्या क्षेत्रातील श्वेतक्रांती पाहिली, पिकांच्या संदर्भातली हरित क्रांती पहिली. आणि आता महाराष्ट्राच्या विधानभवनात बसून ऑनलाईन जुगार खेळून या कृषिमंत्र्यांनी केलेली जुगार क्रांती ही पहिली. शेती, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नाशी जराही बांधील की नसणाऱ्या या कृषिमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी ज्याला शेती संदर्भात खऱ्या अर्थाने जाण असेल आणि त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भात बांधिलकी असेल अशा व्यक्तीलाच ते खातं देण्यात यावं.

वंचित बहुजन आघाडीचे ही ठाम आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाइन जुगार खेळत असतील तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनाने द्यावी, त्यांना मंत्रिपदाच्या कामात अडकवून ठेवू नये. जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता येईल यासाठी तातडीने त्यांच्याकडनं राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे.

Tags: MaharashtraManikrao Kokatemumbaivbaforindia
Previous Post

महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन; बिहार विधानसभेवर २३ जुलै रोजी शांती मार्च!

Next Post

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा: राजकीय वर्तुळात तर्कवितर्क, महाभियोग प्रस्तावाशी संबंध असल्याची चर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home