Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
October 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
       

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर झाला असून, रोजगाराची कमतरता भासत आहे. वाढती महागाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील ताण यांमुळे सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक गरीब, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व अल्प उत्पन्न गटातील महिलांनी मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हाताला काम नाही. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीत मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्मचारी व वसुली प्रतिनिधी महिलांकडे वारंवार जाऊन हप्त्यांसाठी तगादा लावत मानसिक दबाव आणत आहेत. औरंगाबाद शहर जिल्ह्यात सक्तीने वसुली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या होत्या.

– मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून महिलांवर होत असलेल्या सक्तीच्या व त्रासदायक कर्जवसुलीच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. 

-दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांकडून धमकी, दबाव, अपमान किंवा अन्य अनुचित पद्धतीने कर्जवसुली होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना लागू कायदे व नियामक निर्देशांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत.

– जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व संबंधित मायक्रोफायनान्स कंपन्यांचे शाखा व्यवस्थापक, कार्यालयप्रमुख, वसुली अधिकारी व वरिष्ठ प्रतिनिधी यांची तातडीने बैठक बोलवावी. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, शहर व तालुका पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची संधी द्यावी.

– दुष्काळी परिस्थितीमुळे हप्ते भरण्यात अडचणी येत असलेल्या कर्जदार महिलांच्या प्रकरणांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन, संबंधित कर्ज करार व लागू नियमांच्या चौकटीत हप्त्यांची पुनर्रचना, मुदतवाढ किंवा इतर उपलब्ध सवलतींबाबत विचार करण्यासाठी कंपन्यांना निर्देश द्यावेत. 

– दुष्काळी व आर्थिक संकटग्रस्त भागांतील कर्जदारांच्या अडचणींचा विचार करून, संबंधित नियामक संस्था व वित्तीय संस्थांशी समन्वय साधत शासनाने ही कर्जे माफ करून सरकारने त्यांचा भरणा करावा.

या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, याची माहिती घेण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, संघटक राजन किर्तने, जिल्हा महासचिव इकबाल शेख, पश्चिम युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे, प्रकाश कांबळे, बाबासाहेब दुशिग, बबलू बागवान आदी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट होऊ शकली नाही.

मात्र, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उपविभागीय अधिकारी, मायक्रोफायनान्स कंपन्यांचे अधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सहभागी होतील.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना नांदेड येथील मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयात एक शेतकरी फाशी घेतलेल्या अवस्थेत सापडल्याच्या घटनेची आठवण करून देण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्ह्यात अशी घटना घडण्याची वाट जिल्हा प्रशासन पाहत आहे का, असा जाब जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी विचारला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत वरील बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा महासचिव इंजि. इकबाल शेख, जिल्हा संघटक रवी रत्नपारखे, पश्चिम युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे, बाबासाहेब दुशिग, बबलू भाई बागवान, प्रकाश कांबळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: loanMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadiऔरंगाबाद
Previous Post

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
October 27, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर...

Read moreDetails
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी

October 27, 2026
दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

October 26, 2026
ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

October 26, 2026
नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

October 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home