पाचोरा : पाचोरा तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील (लालासर) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
या प्रसंगी पाचोरा तसेच सारोळा, पिंपळगाव हरेश्वर आदी गावांतील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश करून बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना बळकटी दिली.
बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीची बैठक
या कार्यक्रमानंतर बोलताना जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील (लालासर) यांनी सांगितले की, “हा फक्त प्रारंभ आहे; आगामी काळात वंचित बहुजन आघाडी गावागावांमध्ये, शहराशहरांमध्ये मोठ्या उत्साहाने प्रचार मोहीम राबवणार आहे आणि असंख्य कार्यकर्ते पक्षात सामील होणार आहेत.”
पाचोरा तालुक्यातील हा पक्ष प्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीच्या वाढत्या जनाधाराचा द्योतक ठरला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा आणि उत्साह संचारला आहे.
			

							



