Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ‘वंचित’ समविचारी पक्ष, संघटनांनसोबत लढणार.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ‘वंचित’ समविचारी पक्ष, संघटनांनसोबत लढणार.
       

अहमदनगर – वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा व तालुका कार्यकारणीची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया संदर्भात बैठक जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांचे मागदर्शनाखाली पार पडली. यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे, चंद्रकांत नेटके, पारधे सर, सुरेश खंडागळे, चंद्रकांत डोलारे, युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार, शहर अध्यक्ष संजय जगताप, संतोष जौंजाळ, सोमनाथ भैलुमे, अतिश पारवे, प्यारेलाल शेख, मारुती पाटोळे, रविकिरण जाधव, विनोद गायकवाड, भाऊ साळवे, अमर निरभवणे, अजिमराजे शेख, देवा खरात, संजय शेलार आदीसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका या समविचारी पक्षसंघटना यांना सोबत घेऊन लढणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना  मानणारा एक मोठा वर्ग वंचित बहुजन आघाडी सोबत आहे. सत्ताधारी पक्षातील नाराज गट मोठ्याप्रमाणात आहे ते सर्व वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहे. गट, गण वार माहिती घेऊन व नवीन गट रचना बाबत सखोल चर्चा तालुकाध्यक्ष यांचे सोबत करण्यात आली. यावेळी गट, गण प्रमुख नेमणूक करण्यात आली. बूथ बांधणी करण्याची जबाबदारी ही गट, गण प्रमुखांची असेल त्यासाठी त्यांना मार्गदर्शन योगेश साठे यांनी केले.

बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न जिल्ह्यात राबवायचा आहे. जिल्ह्यात पक्षाला आलेली मरगळ व पक्षाची प्रतिमा उंचवायची असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याने स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्तपणे या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा टक्का आपल्याला लोकसभा, विधानसभापेक्षा कशा  पद्धतीने वाढवता येईल याचा विचार करावा. भविष्यात ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती ना फक्त मतदानाचा हक्क असेल परंतु निवडणुका लढविता येणार नाही असे एकंदरीत इथल्या सत्ताधारी पक्षांची भूमिका उघड उघड दिसून येत आहे त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने करण्यात आली आहेत.


       
Tags: Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

Atrocity दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले तर ‘वंचित’ सहन करणार नाही – चेतन गांगुर्डे 

Next Post

मागासवर्ग आयोगाला बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ देण्यात आलाय ! – राजेंद्र पतोडे

Next Post
मागासवर्ग आयोगाला बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ देण्यात आलाय ! – राजेंद्र पतोडे

मागासवर्ग आयोगाला बोगस 'इम्पिरीकल डेटा' देण्यात आलाय ! - राजेंद्र पतोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home