वंचित बहुजन आघाडी गण प्रमुख व गट प्रमुखांची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न
बीड : वंचित बहुजन आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कंबर कसली असून, भटके-विमुक्त, ओबीसी तसेच मायक्रो ओबीसी समाजातील क्रियाशील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन परिवर्तन घडवण्याचा संकल्प केला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांनी सांगितले. येथील हॉटेल सनराईज, नामगाव फाटा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक संदर्भात तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबतची रणनीती, संघटन बळकटीकरण आणि मतदारांशी संवाद यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडी तक्रार निवारण समितीचे राज्याध्यक्ष विष्णू जाधव, जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, युवक जिल्हाध्यक्ष मेजर अनुरथ वीर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश जावळे, जिल्हा महासचिव खंडू जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, महिला जिल्हा उपाध्यक्षा पुष्पा तुरुकमाने, जिल्हा सहसचिव अर्जुन जोंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष गणेश वीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवा गव्हाणे यांनी मानले.
यावेळी बैठकीत गेवराई तालुका अध्यक्ष गायकवाड पप्पू, युवक जिल्हा उपाध्यक्ष उमेश तुळवे, युवक जिल्हा सचिव प्रकाश ढोकणे, तालुका उपाध्यक्ष महादेव (देवा) गव्हाणे, विश्वास अंगरखे, मुकेश निसर्गध, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष आनंद शिंदे, ऋषिकेश वाघमारे, अरविंद इनकर, निखिल तांगडे, प्रवीण प्रधान, रवी वक्ते, सतीश पायाळ, भीमराव पायाळ, चंद्रकांत निकाळजे, धम्मदीप जावळे, सुरज वाघमारे, अक्षय गायकवाड, देविदास वाघमारे, शरद अंगरखे, निलेश वाघमारे, राहुल अंगरखे, सुधीर मिसळे, राज शिंदे, गणेश शिंदे तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परिवर्तनाचे नवे पर्व सुरू करणार आहे, आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध आहे.





