Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचित’ने ‘मविआ’ ला जागांची यादी सादर केली

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 28, 2024
in राजकीय
0
वंचित’ने ‘मविआ’ ला जागांची यादी सादर केली
       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीची कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती. तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज विश्वास ठेवून महाविकास आघाडीला सादर केलेली आहे. तसेच महाविकास आघाडीला वंचितने एक प्रस्ताव देखील सादर केला आहे. सध्या ज्या पद्धतीने पक्षांतर केले जात आहे, त्या पार्श्र्वभूमीवर घटक पक्षातील प्रत्येक पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही, असे लेखी वचन द्यावे, असे त्यात म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन याआधी वंचितने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली होती. त्या लोकसभा मतदारसंघाची यादी वंचितने तयार केली होती. आता महाविकास आघाडीने वंचितसोबत चर्चा सुरु केली आहे. तरीही वंचितने पूर्ण तयारी केलेल्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला दिली आहे.

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली असती, तर या यादीतील मतदारसंघातील जागा लढविल्या असत्या. पण, आता वंचितला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होतील.

दरम्यान, वंचितच्या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे. संविधान वाचविणे आणि लोकशाहीचे रक्षण करणे तसेच विभाजनवादी भाजप-आरएसएसचा पराभव करणे, हाच वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळेच सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकजुटीने लढले पाहिजे, अशी भूमिका वंचितने मांडली आहे.

मविआला वंचितचा प्रस्ताव

– महाविकास आघाडीचे सामाईक उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना पाठिंबा द्यावा.

– महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत.

– मविआच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही.

– महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान ३ अल्पसंख्याक उमेदवार असावेत.


       
Tags: CongressmahavikasaghadimumbaiNana PatoleNCPPrakash AmbedkarSharad PawarShivsenauddhav thakareVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई

Next Post

‘वंचित’ ने दिलेली यादी ‘मविआ’ त येण्याआधीची

Next Post
महाविकास आघाडी मजबूत राहील!

'वंचित' ने दिलेली यादी 'मविआ' त येण्याआधीची

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बातमी

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

by mosami kewat
March 26, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे...

Read moreDetails
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home