पुणे : उत्तम नगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या खडकवासला विधानसभा शाखेने अनोख्या पद्धतीने पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. त्यांनी पोलिसांना राखी बांधून एक निवेदन सादर केले.
या उपक्रमासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षा वर्षा जाधव यांच्यासह खडकवासला विधानसभा शाखेच्या अध्यक्षा भारती वांजळे, महासचिव दिपा सोनवणे, उपाध्यक्ष विजयमाला भालेराव, प्रसिद्धी प्रमुख सुमन शिंदे आणि संघटक रोहिणी शेलार यांसारख्या पदाधिकाऱ्यांसह अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिसांना जनतेची सेवा करताना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण राहावी आणि त्यांनी अधिक प्रभावीपणे आपले कर्तव्य बजावावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या उपक्रमातून महिलांनी पोलिसांना ‘राखी’ बांधून सामाजिक सुरक्षिततेची भावना व्यक्त केली.