अकोट – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी अकोट तालुक्यात सक्रिय झाली आहे. अंजलीताई आंबेडकर व राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनात आठ सर्कलमध्ये सुसंघटित बैठका घेण्यात आल्या.
या बैठकीत ग्राम शाखा गठितीचे नियोजन, शाखा फलक उभारणी तसेच १५ ऑगस्टच्या तिरंगा रॅलीचे नियोजन यावर भर देण्यात आला. या बैठकीत जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, तालुका अध्यक्ष आशिष रायबोले, महासचिव अमन गवई यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमेश लबडे यांनी केले.
नवनियुक्त सर्कल कार्यकारिणीतील कार्यकर्त्यांना पुढील आठ दिवसांत सर्व शाखांचे नियोजन पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वंचित बहुजन युवा आघाडी अकोट तालुका सध्या राजकीय मैदानात जोमात उतरत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.