तेल्हारा : वंचित बहुजन युवा आघाडीने तेल्हारा तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ या महत्वाकांक्षी अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करून संघटनेची पायाभरणी केली जात आहे. नुकतेच, या अभियानांतर्गत ५ नवीन शाखांचे नामफलक अनावरण करण्यात आले.
२ ऑगस्ट २०२५ रोजी घोडेगाव, पाथर्डी, टाकळी, भांबेरी आणि खेल देशपांडे या गावांमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखांचे नामफलक लावण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या अभियानाला विविध जाती-धर्मातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या कार्यक्रमापूर्वी तेल्हारा येथील शासकीय विश्रामगृहात एक बैठक झाली. या बैठकीत राजेंद्र पातोडे यांनी, देशात संविधानासोबत चाललेल्या खेळामुळे सर्वसामान्यांचे हक्क हिरावले जात आहेत, अशा परिस्थितीत तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी इतिहासातील अनेक क्रांतीची उदाहरणे देत युवकांचे महत्त्व अधोरेखित केले.
महासचिव राजकुमार दामोदर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांनी सक्रिय सहभाग घेऊन विजय मिळवण्याचे आवाहन केले.
तालुकाध्यक्ष झिया अहमद शाह यांनी सांगितले की, वंचित बहुजन युवा आघाडी नेहमीच नागरिक, शेतकरी आणि निराधार लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवते. ज्या तरुणांना समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी या संघटनेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्यात जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वानखडे, नकुल काटे, सचिन शिराळे, जय तायडे, तालुका अध्यक्ष झिया शाह, महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंत इंगळे, आणि प्रसिद्धी प्रमुख रोहित हिवराळे आदी उपस्थित होते.
चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक
जळगाव : महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. जळगाव पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर म्होरक्याला...
Read moreDetails