वाशिम : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वाशिम जिल्ह्यातील नवीन शाखांचे उद्घाटन सोहळे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेच्या विचारांना बळकटी दिली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सूर्यकांत गायकवाड (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी), डॉ. तुषार गायकवाड (वाशिम–मंगरूळपीर विधानसभा प्रमुख), ज्योती इंगळे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन महिला आघाडी), स्वप्निल खडसे (जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी) यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच सर्व शाखांचे शाखाध्यक्ष, सदस्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
या शाखा उद्घाटन सोहळ्यात खालील गावांचा समावेश होता :
१. बिठोडा तेली
२. पार्डी टकमोर
३. पांडव उमरा
या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात युवकांनी संघटित होऊन नेतृत्व करावे, असे आवाहन केले.