Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
February 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
       

अमरावती: तिवसा तालुक्यातील शिवणगाव (फत्तेपूर) येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवकांनी एकत्र येत वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखेची स्थापना केली आहे. या शाखेच्या फलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांच्या हस्ते आणि युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

याप्रसंगी आयोजित छोटेखानी सभेला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि सागर भवते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी काळात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार युवक आणि विद्यार्थी वर्गाच्या न्याय्य हक्कासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या शाखेचे सर्व कार्यकर्ते सदैव तत्पर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Vanchit bahujan aghadi)

कार्यक्रमात नवनियुक्त ग्रामशाखा कार्यकारिणीला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मान्यता देऊन सन्मानित केले. यावेळी प्रामुख्याने अध्यक्ष आशुतोष इंगळे , उपाध्यक्ष सागर गणेश, सचिव आकाश इंगळे उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव मुस्ताक शहा, अनिल सोनाने, युवा आघाडी तालुका महासचिव अमोल जवंजाळ, प्रवीण निकाळजे, तालुका सदस्य अतुल खडसे, नितीन थोरात, प्रदीप सांभारे, गौतम इंगळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र खडसे, राहुल आठवले, सचिन खडसे, शुभम खडसे, प्रतीक मेटांगे, नितीन मोंढे, संजय राजघरे, मुकेश तंतरपाले, भावेश खडसे, विशाल खडसे, मनीष गजरे, सागर इंगळे, अनिकेत खडसे, गजानन खंडारे, अमन शहा, अनिकेत नव्हाळे, अक्षय इंगोले, नदीन मुल्ला व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


       
Tags: amravatiMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindiaअमरावती
Previous Post

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

Next Post

‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 

Next Post
‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 

'ठाणे की रिक्षा...' गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!
article

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

by mosami kewat
April 2, 2026
0

- धनंजय कांबळे  महाराष्ट्राची ओळख प्रगतीशील, विवेकी आणि सामाजिक न्यायाच्या परंपरेशी जोडलेली आहे. पण सध्याच्या घडामोडी पाहिल्या, तर ही ओळख...

Read moreDetails
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

April 2, 2026
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home