औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडी, औरंगाबाद (मध्य)च्या वतीने एकतानगर आणि अंबर हिल परिसरात नुकतेच तीन नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यक्षेत्र वाढले असून, तरुणांना संघटित करण्यासाठी बळ मिळणार आहे.
या शाखांचे उद्घाटन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनवेळी जिल्हा महासचिव सतीश शिंदे, शहराध्यक्ष (मध्य) मिलिंद बोर्डे, उपाध्यक्ष दिनेश नवगिरे, नागेश जाधव, कुणाल गायकवाड, शहर संघटक रवींद्र गवई, आणि उपाध्यक्ष जावेद पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन युवा शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी केले होते. या नवीन शाखांच्या माध्यमातून युवकांना एकत्र आणून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सक्रिय काम करण्याची दिशा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.