Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 19, 2024
in Uncategorized
0
वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले असून, यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

या पत्रात म्हटले आहे की, 17 मार्च रोजी मुंबईतील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समापन महासमारंभात तुम्हाला आणि श्री राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आपण विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे.

शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा – फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे. या विचाराने मी महाराष्ट्रातील 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मी तुम्हाला विनंती करतो की, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी 7 मतदारसंघांची नावे मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे ग्राउंडवर आणि धोरणात्मक पाठिंबा देईल.

वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या प्रस्तावावर काँग्रेस काय प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


       
Tags: Congressmallikarjun kharagePrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी ऑन रेकाॅर्ड बोलावे

Next Post

काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पूर्णपणे मदत करायला तयार : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पूर्णपणे मदत करायला तयार : ॲड. प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पूर्णपणे मदत करायला तयार : ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार
बातमी

ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार

by mosami kewat
February 12, 2026
0

ओडिशा : एकीकडे देश प्रगती आणि समानतेच्या गप्पा मारत असताना, ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातून सामाजिक विषमतेचे एक धक्कादायक चित्र समोर आले...

Read moreDetails
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

February 12, 2026
छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

February 12, 2026
मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

February 12, 2026
पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

February 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home