बिर्ला कामगारांच्या हक्काच्या घरासाठी गिरणी कामगाराच्या धरतीवर राहत्या जागीच घर उपलब्ध होणार – अंजलीताई आंबेडकर
अकोला: बिर्ला कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस 400 च्या जवळपास बिर्ला कामगार व महिला उपस्थित होत्या. सत्ताधाऱ्यांनी बिर्ला कामगारांची फसवणूक करून जमीन हडपण्याचा जो डाव आखला आहे त्याबाबत लवकरच बिर्ला कामगार व वंचित बहुजन आघाडी लढा देणार आहे.
जिल्हा कचेरीवर आंदोलनाचा पवित्रा पाच पिढ्यापासून राहत असलेल्या बिर्ला कामगारांना नेस्तनाबूत करण्याचा जो डाव अकोल्यातील सत्ताधारी पक्षाने आखला आहे. त्याला सत्य कागदपत्रांनी प्रत्युत्तर देणार आणि ज्या जागेवर महानगरपालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपयाचा विकास केला ती जागा सत्ताधारी पक्षांना मोकळी आहे. तिथे कोणीच राहत नाही असे त्यांनी सिद्ध केले आहे, तर मग विकासापोटी झालेल्या खर्चाची पडताळणी का केली नाही आज बिर्ला कामगारांना पंतप्रधान आवास योजनेच्या हक्काची घराची योजना 2015 ला अर्ज करून दिल्या सुद्धा का उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यांच्याकडून विविध प्रकारची कर आकारणी कशी करण्यात येते या सर्व प्रश्नांबाबत आज बिर्ला कॉलनी येथे मेळाव्यात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी प्रा.अंजलीताई आंबेडकर, निलेश देव, पुष्पाताई इंगळे, अशोक चव्हाण, मुकेश मेश्राम, समाधान वारघडे, ,सचिन वारघडे, राज घुमन, योगेश वाणी,अमित मिश्रा, निलेश पवार, यादव , सुधीर मस्के,,व समस्त बिर्ला रहिवासी समस्त बिर्ला कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.