भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात संरक्षण भिंतीअभावी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश कार्यकारिणीने घटनास्थळी भेट दिली. या घटनेनंतर परिस्थितीची पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे.
या अगोदर पावसाळ्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या होत्या, याबाबत सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन माहितीही घेण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सुरक्षा भिंती न उभारल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला हा धोरणशून्यतेचा खेळ थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत आघाडीचा लढा सुरूच राहील, असा ठाम इशारा पक्षाने दिला आहे. सदर भेटीवेळी वंचित बहुजन आघाडी मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी, जिल्हा महासचिव विश्वास सरदार आणि सतीश राजगुरू उपस्थित होते.